नाशिक-पुणे महामार्गावर सात पिकअप वाहनांतून 16 बैलांची दाटीवाटीने वाहतूक

प्राण्यांचा छळ केल्याप्रकरणी 11 जणांविरुद्ध नाशिकरोड पोलिसांत गुन्हा

सिडको : प्रतिनिधी
नाशिक-पुणे महामार्गावरील फुलेनगर परिसरात राममंदिराजवळ सात पिकअप वाहनांतून 16 गोवंशीय बैलांची दाटीवाटीने वाहतूक करताना आढळल्याने नाशिकरोड पोलिसांनी अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जनावरांना इजा होईल अशा पद्धतीने वाहतूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक-पुणे महामार्गावरील फुलेनगर भागात असलेल्या राममंदिराजवळ सात पिकअप वाहनांतून गोवंशीय बैलांची वाहतूक केली जात होती. या वाहनांमध्ये जनावरे दाटीवाटीने कोंबून नेली जात असल्याचे निदर्शनास आले. या सात वाहनांत प्रत्येकी दोन ते तीन बैल होते. जनावरांची एकूण संख्या सोळा आहे. त्यात वेगवेगळ्या रंगांच्या आणि अंदाजे दोन ते सहा वर्षे वयोगटातील बैलांचा समावेश आहे.

या प्रकरणात एमएच06-बीडब्ल्यू 7049, एमएच 15-एचएच 3776, एमएच 04-जीआर 2720, एमएच04-एलक्यू 5851, एमएच 15-जेव्ही 1239, एमएमच 01- सीआर 5346, एमएच 15- जेसी 7310 या क्रमांकांच्या पिकअप वाहनांचा समावेश आहे.

याप्रकरणी मुरलीधर तुकाराम वाघले, जयराम भास्कर नाठे, निवृत्ती मधुकर खोडे, करण रतन गांगुर्डे, श्रीकांत रतन गांगुर्डे, मोतीराम हरी वाघमारे, मालक गंगाराम हनुमंत गवळी, हेमराज पंडित पागी, शरद बाबूराव भांगरे, ज्ञानेश्वर मखल भांगरे आणि कमलाकर रामदास भोये यांच्याविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नाशिकरोड पोलीस करीत आहेत.

16 bulls transported in a dense traffic on the Nashik-Pune highway in seven pickup vehicles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *