सिमेंट मिक्सर गाडीच्या धडकेने १९ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यु
सातपूर: प्रतिनिधी
सातपूर एम आय डी सी गजबजलेला परिसर आहे. आज दुपारी सिमेंट मिक्सर गाडीने दुचाकीला धडक बसल्याने 19 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
दुचाकीवरून दोन जण जात असताना मिक्सर गाडीने दुचाकीला धडक दिल्याने तेजस गंगाधर वनसे, वय १९ वर्ष हा हा बाँश कंपनी च्या रोड ने प्रबुद्ध नगर कडे जात असताना अपघात होऊन मृत्युमुखी पडला.
सिमेंट मिक्सर ट्रकच्या चालकाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम चालु आहे”, असे अधिकाऱ्याने सांगितले. आजकाल हिट अँड रनच्या अपघातात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळते आहे. त्यातूनही मोठ्या प्रमाणात वाहन चालविताना निष्काळजीपणा होतो आहे. अशावेळी नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक झाल्याचे दिसून जरी येते असले तरी सिमेंट मिक्सर वाहन चालक अनेक वेळा जोरात गाडी चालवताना दिसतात त्यातून त्याच कंपनी सिमेंट मिक्सर ट्रकच्याच गाडीने अपघातात जीव गेल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. दुचाकी चालक व कंपनी प्रशासनावर कारवाई ह्वावी असे नागरिकांचे म्हणणे आहे
कांदा निर्यात शुल्क वेळेवर रद्द न केल्याने कांद्याचे बाजार भाव पडले राजू शेट्टी यांचा आरोप…
केवळ चर्चा, बोलणी कधी? शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…
नांदगाव: प्रतिनिधी मालेगाव येथील हॉटेल शिवा पंजाब येथे भाजीमध्ये झुरळ आढळून आले या संदर्भात व्यवस्थापक…
न्यूरो सर्जन वळसंगकर आत्महत्येला वेगळा अँगल नेमक्या कोणत्या कारणामुळे डॉक्टरांनी घेतल्या गोळ्या झाडून सोलापूर: सोलापूर…
नर्मदे हर ..... लेखक: रुपाली जाधव,सटाणा नर्मदा परीक्रमा पूर्ण करण्याचे स्वप्न गेल्या 2वर्षांपासून मनात घोळत…
*संकोच... लेखिका: अंजली रहाणे/थेटे *संकोच हा वैरी सत्याचा* *संकोच हा घात नात्याचा* संकोच अर्थात संशय…