संशयिताला तीन दिवसांची पोलीस कोठडी
निफाड : तालुका प्रतिनिधी
पुणे येथील बालिकेवरील अत्याचार प्रकरणावरून संतापाची लाट उसळत असताना निफाड तालुक्यातील चाटोरी येथे मजुरीसाठी आलेल्याच्या तीनवर्षीय बालिकेवर एकोणीसवर्षीय युवकाने अत्याचार केल्याची निंदनीय घटना घडली.
चाटोरी शिवारात गेल्या महिनाभरापासून रणखेडा (जि. जळगाव) येथून ऊसतोडणीसाठी हे कुटुंब आले होते. त्याचवेळी तीनवर्षीय पीडितेचे वडील हे गावी गेलेले असल्याने पीडितेसह तिची आई व मुले चाटोरी शिवारात होते. 1 मे रोजी दुपारी चारला पीडितेला तहान लागल्याने पीडितेची आई पाणी आणण्यासाठी बाहेर गेल्यावर संशयित समीर भाऊसाहेब महाले (वय 19) याने बालिकेवर अत्याचार केला. आई बालिकेला पाणी घेऊन आली. त्यावेळी तिने संशयित पीडितेवर कूकर्म करत असताना पाहिले. संशयिताने तेथून पळ काढला. याबाबत सायखेडा पोलीस ठाण्यात पीडितेच्या आईनेे दिलेल्या फिर्यादीवरून बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. संशयित समीर महाले याला अटक करून निफाड जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता, त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
19-year-old youth abuses three-year-old girl in Chatori
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…