अकरावीचे 20,061 ‘कॅप’ प्रवेश निश्चित

विज्ञान शाखेला सर्वाधिक पसंती

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक विभागातील इयत्ता अकरावी प्रवेशप्रक्रियेला वेग आला असून, 31 मे 2026 रोजी एकूण 20 हजार 61 विद्यार्थ्यांचे ‘कॅप’ अंतर्गत प्रवेश निश्चित झाले आहेत.
याशिवाय, 1 हजार 371 विद्यार्थ्यांनी कोटा अंतर्गत प्रवेश घेतला आहे. विभागात विज्ञान शाखेला सर्वाधिक पसंती मिळाली असून, नाशिक जिल्हा प्रवेशसंख्येत आघाडीवर आहे. विज्ञान शाखेत सर्वाधिक 10,586 प्रवेश निश्चित झाले असून, कला शाखेत 6,774 तर वाणिज्य शाखेत 2,701 प्रवेश झाले आहेत. त्यामुळे विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा स्पष्ट कल दिसून येत आहे.
जिल्हानिहाय प्रवेश आकडेवारी अशी :
नाशिक जिल्हा विभागात अव्वल ठरला असून, काल दिवसभरात विज्ञान शाखेत 4,592, कला शाखेत 2,268 आणि वाणिज्य शाखेत 1,371 प्रवेश निश्चित झाले आहेत. तसेच 490 विद्यार्थ्यांनी कोट्यातून प्रवेश
घेतला आहे.
जळगाव जिल्ह्यात विज्ञान शाखेत 2,903, कला शाखेत 2,016 आणि वाणिज्य शाखेत 953 प्रवेश पूर्ण झाले असून, 409 प्रवेश कोट्यातून झाले आहेत.
धुळे जिल्ह्यात विज्ञान शाखेत 2,081, कला शाखेत 1,262 आणि वाणिज्य शाखेत 205 प्रवेश नोंदवले गेले आहेत. येथे 188 विद्यार्थ्यांनी कोट्यातून प्रवेश घेतला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात मात्र कला शाखेला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला असून, 1,228 प्रवेश झाले आहेत. याशिवाय, विज्ञान शाखेत 1,010 आणि वाणिज्य शाखेत 172 प्रवेश निश्चित झाले आहेत. येथे 284 विद्यार्थ्यांनी कोटा अंतर्गत प्रवेश घेतला आहे.
राज्यात विभागनिहाय प्रवेशात पुणे विभाग 32 हजार 744 प्रवेशांसह अव्वल, मुंबई विभाग 23 हजार 58, तर नाशिक विभाग 20 हजार 61 प्रवेशांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश निश्चित केलेला नाही, त्यांनी 3 जून 2026 पर्यंत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

20,061 ‘CAP’ admissions for class 11 confirmed

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *