डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त शहर निळेशार; विविध कार्यक्रम व भव्य मिरवणुकीचे आयोजन
सिन्नर : प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सिन्नर शहर व तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम व अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सोमवारी सायंकाळपासूनच या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे, अशी माहिती जयंती समितीचे अध्यक्ष प्रितम जाधव, उपाध्यक्ष अमोल जाधव व खजिनदार हर्षल जगताप यांनी दिली.
सिन्नर शहरातील वावीवेस भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याभोवती आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पुतळ्याभोवती सुमारे 25 फूट उंचीचा भगवान बुद्धांचा देखावा उभारण्यात आला असून तो नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. समितीचे अध्यक्ष प्रितम जाधव यांच्या संकल्पनेतून हा देखावा साकारण्यात आला आहे.
शिर्डी, संगमनेर व नाशिक मार्गांवर निळे ध्वज लावण्यात आल्याने संपूर्ण शहर निळेशार झाले आहे. सोमवारी रात्री वावीवेस परिसरात सांस्कृतिक व नृत्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
मंगळवारी (दि. 14) शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात येणार आहे. त्यानंतर दिवसभर विविध संघटना व राजकीय पक्षांच्या वतीने अभिवादनाचे कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी पाच वाजता वावीवेस भागातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
25 feet tall statue of Lord Buddha at Sinnar
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…