प्लास्टिक वापरणार्‍यांना 25 लाखांचा दंड

नाशिक : प्रतिनिधी
पर्यावरणास हानिकारक असलेल्या प्लास्टिक पिशव्यांना शहरात प्रतिबंध करण्यात आलेला आहे. मात्र, तरीही काही विक्रेत्यांकडून प्लास्टिकचा वापर सुरू असल्याचे चित्र आहे. दरम्यान, मनपाच्या घनकचरा विभागाने प्लास्टिक विक्रेत्यांना दणका देत 1 एप्रिल 2025 ते 23 फेब्रुवारी पर्यंत 24 लाख 90 हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. शिवाय 485 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शहरात प्लास्टिक पिशव्यांवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. दरम्यान, नियमांना पाठ दाखवत प्लास्टिक वापरणार्‍यांचा शोध घेऊन कारवाई केली जात आहे. घनकचरा विभागाने 1 एप्रिल 2025 ते फेब्रुवारीदरम्यान कारवाई करत प्लास्टिकचा वापर करणार्‍यांना दणका दिला आहे. घनकचरा विभागाने नाशिकरोड, नाशिक पूर्व, पश्चिम, नवीन नाशिक, पंचवटी व सातपूर या सहाही विभागांत पथकांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार प्लास्टिक विक्री करणार्‍यांचा शोध घेतला जात असून, दंडात्मक कारवाई केली जाते. प्रसंगी थेट गुन्हेही दाखल केले जात आहेत. बाहेरून शहरात प्लास्टिक येत असल्याने महापालिकेकडून शहरात प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाई केली जाऊ शकते. मात्र, शहराबाहेर जाऊन कारवाईचे अधिकार महापालिकेला नाहीत.

शहरात कुठेही कोणी प्लास्टिकचा वापर करत असेल, तर अशांविरोधात दंडात्मक कारवाई केली जाईल.
– अजित निकत, उपायुक्त, मनपा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *