नाशिकमध्ये रेयर फेअर-2026 चे आयोजन
नाशिक ः प्रतिनिधी
नाणी म्हणजे केवळ धातूचे तुकडे नव्हेत, तर ती काळाच्या ओघात घडलेल्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाची जिवंत साक्ष असतात. हाच इतिहास प्रत्यक्ष अनुभवण्याची दुर्मिळ संधी नाशिककरांना मिळणार आहे. शहरात दि. 9, 10 व 11 जानेवारी 2026 रोजी राष्ट्रीय स्तरावरील रेयर फेअर- 2026 या दुर्मिळ नाणी, नोटा, स्टॅम्प व अँटिक वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
सीएसएनआरआय आणि सह-आयोजक राजापूरकर सराफ यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन चोपडा लॉन्स, जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड, नाशिक येथे भरविण्यात येणार आहे. सकाळी 10.30 ते रात्री 8 या वेळेत सर्वांसाठी खुले असलेल्या या प्रदर्शनास प्रवेश मोफत आहे.
या अनोख्या प्रदर्शनात इ.स.पूर्व सुमारे 600 वर्षांपासून आजपर्यंतचा तब्बल 2600 वर्षांचा भारतीय इतिहास नाण्यांच्या माध्यमातून उलगडणार आहे. पंचमार्क नाणी, सातवाहन, क्षत्रप, यादव, मराठा कालखंडातील विविध छत्रपतींची नाणी, मुघल साम्राज्य, ब्रिटिश इंडिया तसेच रिपब्लिक इंडिया कालखंडातील दुर्मिळ नाणी व नोटा येथे पाहायला मिळणार आहेत.
भारताच्या विविध शहरांतील नामवंत, अभ्यासू व अनुभवी नाणे संग्राहक आपापले ऐतिहासिक संग्रह याठिकाणी प्रदर्शित करणार आहेत. देशभरातील राजवटी, त्या-त्या काळातील अर्थव्यवस्था व राजकीय घडामोडी नाण्यांतून एकाच छताखाली पाहण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे.
या प्रदर्शनात 28 विविध स्टॉल्स असणार आहेत. दुर्मिळ नाणी व नोटांची खरेदी-विक्री करण्याची संधीही नागरिकांना उपलब्ध होणार आहे. विद्यार्थी, अभ्यासक, इतिहासप्रेमी, तसेच नाणी संग्रहाची आवड असलेल्या संग्राहकांसाठी हे प्रदर्शन ज्ञानवर्धक व प्रेरणादायी ठरणार आहे. यानिमित्ताने नाणी संग्रह व इतिहास संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्कार- 2026 प्रदान करण्यात येणार आहे. हा मानाचा पुरस्कार पुरुषोत्तम भार्गवे (नाशिक) आणि अशोकसिंग ठाकूर (नागपूर) यांना त्यांच्या दीर्घकालीन संशोधन व नाणेसंवर्धनातील योगदानाबद्दल दिला जाणार आहे.
या उपक्रमाचे आयोजन विनयकुमार चुंबळे (अध्यक्ष, सीएसएनआरआय) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. चेतन राजापूरकर सह-आयोजक म्हणून सक्रिय सहभाग घेत आहेत. संस्थेच्या कार्यकारिणीत नलिनी गुजराथी (उपाध्यक्ष), कपिल पाठक (सचिव), जितेश पालिजा (खजिनदार) यांच्यासह कार्यकारिणी परिश्रमपूर्वक कार्यरत आहे.
या कार्यक्रमासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक आणि प्रा. संजीव सोनवणे (कुलगुरू, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दिलीप फडके (अध्यक्ष, सावाना) आणि डॉ. डी. एम. गुजराथी (सदस्य, व्यवस्थापन मंडळ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) यांची प्रमुख उपस्थिती लाभेल.
नाणी केवळ धातूचे तुकडे नसून ती आपल्या देशाच्या राजकीय, सांस्कृतिक व आर्थिक इतिहासाची जिवंत साक्ष आहेत. रेयर फेअर- 2026 च्या माध्यमातून हा अमूल्य वारसा जनतेसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन अध्यक्ष विनय चुंबळे यांनी
केले.
2600 years of India’s living history will be revealed through coins
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…