नाशिक

नाशिकला शिवसेनेचाच महापौर : खा. शिंदे

नगरपालिका निवडणुकीतील स्ट्राइक रेटवरून भाजपला टोला

नाशिक : प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत सर्वाधिक पाच ठिकाणच्या जागांवर विजय मिळवला. त्याचप्रमाणे नाशिक महापालिकेतही सर्वाधिक स्ट्राइक रेट असेल, असा टोला भाजपचे नाव न घेता शिंदेसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लगावला.
पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाररॅलीचे बुधवारी (दि. 7) आयोजन करण्यात आले होते. ही रॅली पंचवटीतील श्री काळाराम मंदिर येथून सुरू झाली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत नाशिक महापालिका निवडणुकीवर त्यांनी भाष्य केले. यावेळी मंत्री दादा भुसे, सचिव भाऊसाहेब चौधरी, माजी खासदार हेमंत गोडसे, शिवसेना जिल्हाप्रमुख व उपनेते अजय बोरस्ते, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे आदी उपस्थित होते.
खासदार डॉ. शिंदे पुढे म्हणाले, की नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीमध्ये राज्यात शिवसेनेचा स्ट्राइक रेट हा सगळ्यात जास्त होता. आता तो होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्येदेखील सर्वांच्या पुढे असेल यात कोणतीही शंका नाही. राज्यात उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीप्रमाणे विकासाचे कार्य सुरू आहे विकासाला गती मिळत आहे त्यावर लोकांचा विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या जोरावरच महापालिकांमध्ये आम्ही सर्वप्रथम राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तेे म्हणाले की, आम्ही महायुती म्हणूनच निवडणुकांना सामोरे गेलो आहोत. निवडणुकांमध्ये शिवसेनेचा स्ट्राइक रेट हा सगळ्यांच्या पुढे असेल, यात शंका नाही. त्यामुळे नाशिक महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल. मतदारही शिवसेनेला पसंती देत आहेत.

काँग्रेसशी युतीवर भाजपच उत्तर देईल

भाजपने शिंदेसेनेला अंबरनाथ येथे दूर करण्यासाठी चक्क काँग्रेसशी हातमिळवणी केली. अकोल्यातल्या अकोटमध्ये सत्तेसाठी एमआयएमला सोबत घेतल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, यावरून खा. डॉ. शिंदे यांना विचारले असता, त्यांनी यावर बोलणे टाळत याप्रश्नी भाजपनेच उत्तर द्यायला हवे, असे म्हटले. आम्ही नेहमीच काँग्रेसविरोधी असल्याचे नमूद केले.

रॅलीने नाशिकरोड परिसर दुमदुमला

नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना शिंदे गटाचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नाशिकरोड विभागातील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रभागांतून भव्य प्रचारफेरी काढल्याने वातावरण ढवळून निघाले. त्यांच्यासमवेत शिक्षण ंत्री दादा भुसे, पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजूअण्णा लवटे, माजी खासदार हेमंत गोडसे, विजय करंजकर, शिवाजी भोर यांसह इतर पदाधिकारी होते. जयभवानी रोडवरील कदम मळ्यात सुप्रिया गणेश कदम यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी कैलास मुदलियार, दुर्गा चिडे, प्रदीप बागूल हे प्रभाग 20 मधील उमेदवार उपस्थित होते. त्यानंतर तुळजाभवानी मंदिरात त्यांनी तुळजाभवानी मातेची पूजा करून कौल मागितला. यावेळी सूर्यकांत लवटे, ज्योती शामराव खोले, रमेश धोंगडे हे शिवसेनेचे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नयना वाघ हे उमेदवार उपस्थित होते. बिटको चौकातही या रॅलीचे पदाधिकार्‍यांनी स्वागत करून फटाक्यांच्या आतषबाजीने चौक दुमदुमला. रॅलीत चौकाचौकांतून खा. डॉ. श्रीकांत शिंदेंसह पदाधिकार्‍यांना औक्षण केले जात होते. आगर टाकळी येथील महात्मा
फुलेंच्या पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

15 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

15 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago