नाशिक

सिन्नर तालुक्यातील 26 ग्रा.पं. क्षयरोगमुक्त

तहसीलदारांच्या उपस्थितीत आज रौप्य आणि कांस्य पदकाने होणार सन्मान

सिन्नर : प्रतिनिधी
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत टीबीमुक्त झालेल्या सिन्नर तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींना कांस्यपदक तर 3 ग्रामपंचायतींना रौप्यपदक देऊन गौरवण्यात येणार आहे.
राष्ट्रीय पंचायत दिनाचे औचित्य साधून आज गुरुवारी (दि.24) सिन्नर पंचायत समितीच्या स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे सभागृहात दुपारी 3 वाजता तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्या हस्ते या ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
यावेळी गटविकास अधिकारी अशोक भवारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, तालुका क्षयरोग अधिकारी प्रकाश जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत जिल्हा आरोग्य विभागामार्फत क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत, माझी जबाबदारी हे अभियान राबवण्यात आले होते.
तालुक्यातील 114 ग्रामपंचायतींपैकी 23 ग्रामपंचायती पहिल्या वर्षी कांस्यपदकाच्या मानकरी ठरल्या आहेत. तर सलग दुसर्‍या वर्षी क्षयरोगमुक्त झाल्याने तीन ग्रामपंचायतींना रौप्यपदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.

तीन ग्रामपंचायतींना रौप्यपदक

सलग दुसर्‍या वर्षी क्षयरोगमुक्त राहणार्‍या ग्रामपंचायतींना रौप्यपदक देऊन सन्मानित करण्यात येते. यंदा तालुक्यातील देवपूर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत फर्दापूर, पांढुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आगासखिंड आणि दापूर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत दोडी खुर्द या तीन ग्रामपंचायतींना रौप्यपदक देऊन गौरविण्यात येणार आहे.

असे आहेत पुरस्काराचे निकष

* एक हजारमध्ये तीसपेक्षा अधिक संशयित रुग्णांची तपासणी.
* एक हजारांमध्ये एकपेक्षा कमी रुग्ण. * रुग्ण बरे होण्याचे 85 टक्क्याहून अधिक प्रमाण. * ड्रग सेन्ससिटिव्हिटी 60 टक्क्याहून अधिक प्रमाण. * क्षयरुग्णासाठी उपचारासह पोषण कीट व अन्य सुविधांची 100 टक्के उपलब्धता. * क्षयरुग्णासाठी 100 टक्के निक्षय मित्र तयार करणे. * पहिल्या वर्षी ब्रांझ, दुसर्‍या वर्षी सिल्व्हर व तिसर्‍या वर्षी सुवर्णपदक पुरस्कार देण्यात येतात.

Gavkari Admin

Recent Posts

पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी मनसे महिला कार्यकर्तीच्या कानशिलात लगावली

इंदिरानगरमध्ये  ठिय्या, पोलीस निरीक्षकावर मारहाणीचा आरोप सिडको विशेष प्रतिनिधी :-इंदिरानगर पोलीस ठाण्यात सोशल मीडियावर वादग्रस्त…

30 minutes ago

निर्यातशुल्क वेळेत रद्द न केल्याने कांद्याचे भाव पडले

माजी खासदार शेट्टी ः योग्य वेळी पाऊल उचलणे आवश्यक होते लासलगाव ः वार्ताहर सध्या कांद्याला…

8 hours ago

‘सीटू’चा तहसील कार्यालयावर मोर्चा

इगतपुरीत शेतकरी, कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन इगतपुरी ः प्रतिनिधी तालुक्यातील शेतकरी व कामगारांच्या विविध समस्या…

9 hours ago

हरणूल, हरसूलच्या शिवारात बछड्यांसह बिबट्याचा मुक्त संचार

सोग्रस : चांदवड तालुक्यातील हरणूल व हरसूलच्या शिवारात गेल्या चार ते पाच दिवसांपासून बछड्यांसह बिबट्याचा…

9 hours ago

मोह शिवारात विहिरीत पडून काळविटाचा मृत्यू

सिन्नर : तालुक्यातील मोह येथे 60 फूट खोल विहिरीत पडून काळवीटाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी…

9 hours ago

पुस्तके माणसाला समृद्ध करतात : गाडगीळ

सावानाच्या वाङ्मयीन पुरस्कारांचे वितरण नाशिक : प्रतिनिधी पुस्तकांत माणसांना समृद्ध करण्याची शक्ती असते. पुस्तक वाचनातून…

9 hours ago