नाशिक

पुस्तके माणसाला समृद्ध करतात : गाडगीळ

सावानाच्या वाङ्मयीन पुरस्कारांचे वितरण

नाशिक : प्रतिनिधी
पुस्तकांत माणसांना समृद्ध करण्याची शक्ती असते. पुस्तक वाचनातून व्यक्तींच्या विचारांना चालना मिळते. पुस्तक ही जगण्याची दिशा देतात. त्यासाठी तरुण पिढीने वाचन करायला हवे. वाचाल तरच वाचाल, असे प्रतिपादन ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांनी केले.
सार्वजनिक वाचनालय, नाशिकच्या वतीने देण्यात येणारे 2024 चे विविध वाङ्मयीन पुरस्कारांचे वितरण सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते बुधवार दि.23 रोजी सावानाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृह येथे करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर सावानाचे अध्यक्ष दिलीप फडके, उपाध्यक्ष प्रा. सुनील कुटे, प्रमुख सचिव सुरेश गायधनी, रमेश धोंडगे, सुनंदा अमरापूरकर, सांस्कृतिक सचिव जयप्रकाश जातेगावकर, कार्याध्यक्ष संजय करंजकर आदी मान्यवर उपस्थित होते. स्वत:ला वाचनाची सवय जडली, त्यामुळे उत्तमोत्तम पुस्तके मुलांच्या हातात द्या. वाचनाने माणूस समृद्ध होतो, असे ते म्हणाले. प्रास्ताविक जयप्रकाश जातेगावकर यांनी केले. यानंतर पुरस्कारार्थींचा परिचय प्रा. सुनील कुटे, सावानाचे कार्याध्यक्ष संजय करंजकर आणि ग्रंथ सचिव देवदत्त जोशी यांनी करून दिला. परीक्षकांच्या वतीने प्रा. अनंत येवलेकर यांनी तर पुरस्कारार्थींमधून प्रा. रमेश धोंडगे, सुनंदा अमरापूरकर यांनी मनोगत व्यक्त केले. सावानाचे प्रमुख सचिव सुरेश गायधनी यांनी प्रास्ताविक केले. अर्थ सचिव गिरीश नातू यांनी सूत्रसंचालन केले. आभार ग्रंथ सचिव देवदत्त जोशी यांनी मानले. यावेळी नाट्यगृह सचिव जयेश बर्वे, मंगेश मालपाठक, वास्तुसंग्रहालय सचिव अ‍ॅड. अभिजित बगदे, प्रा. शिशिर शिंदेकर, डॉ. चंद्रकांत संकलेचा, वंदना अत्रे, प्रा. सुनील हिंगणे आदी उपस्थित होते.

Editorial Team

Recent Posts

संविधान बचाव समितीचा तिरंगा मोर्चा

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी मालेगाव : प्रतिनिधी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीसह मतदार यादीच्या…

4 minutes ago

सिडकोत अतिक्रमणांवर कारवाई

तीन ट्रक विविध साहित्य जप्त सिडको : प्रतिनिधी सिडको विभागातील फुटपाथवर करण्यात आलेल्या अनधिकृत अतिक्रमणांविरोधात…

8 minutes ago

सिटी सेंटर मॉल ते विशाल पेट्रोल पंप मार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रस्त्याच्या कामामुळे वाहनचालकांची कोंडी सिडको : प्रतिनिधी शहरातील सुरू असलेली रस्त्यांची कामे आणि नवरात्रोत्सवानिमित्त रस्त्यांवर…

11 minutes ago

कांद्याच्या दरात घसरण; 13 रुपयांपर्यंत दर कमी

पहिली कांदा एक्स्प्रेस 18 ला आगरतळ्यात नवी दिल्ली : प्रतिनिधी सणासुदीच्या तोंडावर सामान्य ग्राहकांसाठी दिलासादायक…

18 minutes ago

दिल्ली पोलिसांनी तिरंगा यात्रा रोखली

अभिजित दिपके, नेहा बोरा यांना अटक ♦♦♦ सेंट्रल पार्क बंद ♦♦♦ 22 हजार जवान तैनात…

32 minutes ago

डोंगराळे बालिका अत्याचार-हत्याप्रकरणी आरोपीला फाशी

♦ मालेगाव जलदगती न्यायालयाचा निकाल ♦ पीडितेच्या वारसांना 10 लाखांची मदत ♦ अपहरण व पुरावा…

51 minutes ago