नाशिक

चोवीस तासांत शहरात 28 मिमी पाऊस

धरणांतून विसर्ग वाढल्याने गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ

नाशिक : प्रतिनिधी
शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने बुधवारीही हजेरी लावली. मागील चोवीस तासांत नाशिक शहरात 28 मिमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले, तर नदी, नाले आणि ओढे दुथडी भरून वाहू लागले आहेत. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही समाधानकारक पाऊस सुरू असल्याने विविध धरणांतून नियंत्रित स्वरूपात पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण आणि इतर डोंगराळ भागात सुरू असलेल्या पावसामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक वाढत आहे.
22 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत गंगापूर धरणातून 199 क्यूसेक, कडवा धरणातून 1,554 क्यूसेक, भावली धरणातून 1,509 क्यूसेक, पालखेड धरणातून 1,374 क्यूसेक, पुणेगाव धरणातून 702 क्यूसेक, दारणा धरणातून 1,100 क्यूसेक, गौतमी गोदावरी प्रकल्पातून 1,000 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. तसेच नांदूरमध्यमेश्वर बंधार्‍यातून 7,924 क्यूसेक पाणी पुढे सोडण्यात येत असून, होळकर पुलाजवळ 35 क्यूसेक प्रवाहाची
नोंद झाली.

धरणनिहाय पाण्याचा विसर्ग (22 जुलै, सायं. 6 वा.)
गंगापूर – 199 क्यूसेक कडवा – 1,554 क्यूसेक
भावली – 1,509 क्यूसेक पालखेड – 1,374 क्यूसेक
पुणेगाव – 702 क्यूसेक दारणा – 1,100 क्यूसेक
गौतमी गोदावरी – 1,000 क्यूसेक होळकर पूल – 35 क्यूसेक
नांदूरमध्यमेश्वर बंधारा – 7,924 क्यूसेक

28 mm of rainfall in the city in 24 hours.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

2 days ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

2 days ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 days ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 days ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 days ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 days ago