नाशिक

वर्षभरात 31 दाम्पत्यांचा पुन्हा ‘सलोखा

समितीच्या प्रयत्नांमुळे विस्कटलेल्या संसाराची बसली घडी

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
विवाहबंधन तुटण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या दाम्पत्यांना पुन्हा संवादाच्या माध्यमातून एकत्र आणण्याचा प्रयत्न नाशिक कौटुंबिक न्यायालय आणि सलोखा समितीने गेल्या वर्षभरात सातत्याने केला. या प्रयत्नांना यश मिळत आहे. यात 31 दाम्पत्यांनी पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेत रेशीमगाठ जपण्याचा मार्ग स्वीकारला आहे. न्यायालयातील वादाऐवजी कुटुंब टिकविण्याचा संदेश यातून स्पष्ट दिसतो.
कौटुंबिक वादातील वाढत्या प्रकरणांमध्ये न्यायालयाने जलदगतीने निपटारा करण्यावर भर दिला आहे. दाखल प्रकरणे 2,127 असून, निकाली प्रकरणे 1,894, समुपदेशनातून व तडजोडीतून निकाली प्रकरणे 31, लोकअदालतीत तडजोडीची प्रकरणे 69, प्रलंबित प्रकरणे 4,657 आहेत.
समुपदेशन आणि समेटाला प्राधान्य दिल्याने तडजोडीचे प्रमाण वाढले आहे. न्यायालयावरील खटल्यांचा ताण लक्षणीयरीत्या कमी होत असल्याचे दिसले. पालकवादाऐवजी बालहक्कांना प्राधान्य देण्यात येत आहे. पालकांमधील वादांचा थेट परिणाम सहन करणार्‍या मुलांसाठी यावर्षी लेट थीम ब्लूम हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. याअंतर्गत मुलांची भावनिक पुनर्बांधणी, त्यांच्या भावना, मत आणि गरजांना प्राधान्य देण्यात येते. वादातून निर्माण होणार्‍या मानसिक तणावातून मुक्तता या उपक्रमाला पक्षकार, वकील व तज्ज्ञांचा मोठा प्रतिसाद मिळाला. कस्टडी आणि भेटीच्या वादामध्ये नाशिक कौटुंबिक न्यायालयाने एक दूरदर्शी पाऊल उचलत सीआयएल (मुलांचे स्वतंत्र वकील पॅनल) स्थापन केले आहे.
या पॅनलचे उद्दिष्ट मुलांचा स्वतंत्र आणि स्वायत्त दृष्टिकोन न्यायालयापर्यंत पोहोचवणे, पालकांच्या हक्कांपेक्षा मुलांच्या सर्वोत्तम हिताचा विचार, कस्टडी विवादांचे केंद्र मुलांच्या गरजांकडे वळवणे हा उपक्रम महाराष्ट्रात महत्त्वाचा प्रघात ठरत आहे. उच्च न्यायालयाच्या परवानगीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नाशिक कौटुंबिक न्यायालयात सध्या दोन न्यायकक्ष असून, प्रलंबित प्रकरणांची संख्या साडेचार हजारांवर पोहोचली आहे. यामुळे यावर्षी एक अतिरिक्त न्यायालय कक्ष उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रमुख न्यायाधीश प्रसाद पालसिंगणकर यांच्या पुढाकारातून पाच न्यायकक्षांसह आधुनिक, सुसज्ज इमारतीचा 43 कोटींचा प्रस्ताव बांधकाम विभागामार्फत उच्च न्यायालयाकडे पाठवण्यात आला आहे. सन 2026 मध्ये मंजुरीची अपेक्षा आहे. समुपदेशन, संवाद पुनर्स्थापना, बालहितकेंद्रित विचार आणि न्यायालयीन संवेदनशीलता यांच्याआधारे नाशिक कौटुंबिक न्यायालयाने यावर्षी केवळ वाद मिटविण्याचेच काम केले नाही, तर नाती वाचविण्याचे काम प्रभावीपणे केले.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

11 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

11 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

12 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

12 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

12 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

12 hours ago