नाशिक

वन्यजीव उपचार केंद्रात 14 बिबट्यांसह प्राण्यांची शुश्रूषा

जिल्हाधिकार्‍यांकडून पाहणी : म्हसरूळ केंद्राच्या विस्तारासाठी प्रयत्न

नाशिक : प्रतिनिधी
शहरासह जिल्ह्यात रोज कुठे ना कुठे बिबट्या दिसत असल्याच्या घटना निदर्शनास येतात. बिबट्यांना पकडण्यासाठी वन विभाग विविध उपाययोजना राबवत आहे. वन्यजीव व मानवी संघर्षात पकडलेल्या बिबट्यांसह अनाथ बछडे, रस्ते अपघातांत जखमी बिबट्यांसह वन्यप्राण्यांवर उपचारासाठी वन विभागाने म्हसरूळ, नाशिक येथे वन्यजीव उपचार केंद्र कार्यान्वित केले आहे. या केंद्रात सध्या 14 बिबट्यांसह अन्य लहान-मोठे वन्यप्राणी आहेत. या केंद्राची पाहणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी (दि. 12) केली.
वन विभागाच्या म्हसरूळ शिवारात असलेल्या या उपचार केंद्रात सध्या 14 बिबटे आहेत. त्यात नाशिक शहरासह जिल्हाभरात वन विभागाने पिंजरा लावून पकडलेल्या बिबट्यांचाही समावेश आहे. तसेच कोल्हे, लांडगे, तरस यांसारखे अन्य वन्यप्राणी आहेत. या उपचार केंद्रात ‘रेस्क्यू’ या वन्यजीव क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून औषधोपचार आणि देखभाल केली जाते. त्यासाठी राज्य शासनाच्या वन विभागाने वन्यप्राण्यांच्या संवर्धनाबाबत ‘रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट’ या स्वयंसेवी संस्थेबरोबर सामंजस्य करार केला आहे. या केंद्रात समृद्धी महामार्गालगत जखमी अवस्थेत सापडलेल्या बिबट्या मादीचे नामकरण ‘समृद्धी’, असे करण्यात आले आहे. आईपासून दुरावलेल्या मादी बछड्याचे नामकरण ‘परी’ असे करण्यात आले आहे. या केंद्रात वन्यप्राण्यांवर औषधोपचारासाठी वन विभागासह ‘रेस्क्यू’चे सदस्य 24 तास तैनात असतात. या केंद्रात दोन पशुवैद्यकीय अधिकार्‍यांसह अन्य कर्मचारी या प्राण्यांच्या आरोग्याची सतत काळजी घेतात. त्यांचा दैनंदिन आहार निश्चित असतो. या वन्यजीव उपचार केंद्रात अतिदक्षता विभाग, शल्यचिकित्सागृह व आवश्यक त्या सुविधा कार्यान्वित केलेल्या आहेत.
वन विभागाच्या वन्यजीव उपचार केंद्राची जिल्हाधिकारी प्रसाद यांनी शुक्रवारी (दि. 12) सकाळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपवनसंरक्षक राकेश सेपट (पूर्व), सिद्धेश सावर्डेकर (पश्चिम) यांच्यासह ‘रेस्क्यू’चे सदस्य उपस्थित होते.

बिबट्याचे अनाथ बछडे, जखमी बिबट्यांसह वन्यप्राणी वन विभागाच्या वन्यजीव उपचार केंद्रात आणले जातात. तेथे त्यांच्यावर औषधोपचार होऊन त्यांची देखभाल केली जाते. या उपचार केंद्राच्या विस्तारासाठी व आवश्यक सोयी-सुविधांसाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून निश्चितच सहकार्य केले जाईल.
– आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, नाशिक

नाशिक येथे वन विभागाने वन्यजीव उपचार केंद्र कार्यान्वित केले आहे. या उपचार केंद्रात ‘रेस्क्यू’ या संस्थेच्या मदतीने वन्यजीवांवर आवश्यक ते उपचार केले जातात.
– सिद्धेश सावर्डेकर, उपवनसंरक्षक (पश्चिम), नाशिक

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

12 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

12 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

12 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

12 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

12 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

13 hours ago