महाराष्ट्र

अतिवृष्टीग्रस्तांसाठी 31 हजार 628 कोटी

राज्य शासनाकडून पॅकेज, दिवाळी होणार गोड

मुंबई :
राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांची दिवाळी गोड होणार आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांसाठी राज्य शासनाने 31 हजार 628 कोटींचे विशेष पॅकेज काल जाहीर केले. दिवाळीपूर्वीच शेतकर्‍यांच्या खात्यावर मदत जमा होणार आहे. दिवाळी काही दिवसांवर आली असताना चिंतेत सापडलेल्या बळीराजाला शासनाने मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन मदतीचे पॅकेज जाहीर केले.

ज्या शेतकर्‍यांची जमीन अतिवृष्टीच्या पाण्यात वाहून गेली, त्यांना हेक्टरी 3.47 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी पाहणी दौरा केला, तेव्हापासून मदतीच्या पॅकेजची लवकरच घोषणा होईल, अशी अपेक्षा शेतकर्‍यांना होती. त्यातच राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत देण्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही हीच मागणी केली असून, महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष शेतकर्‍यांना तातडीने मदत देण्याची मागणी करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांसाठी मोठ्या पॅकजेची घोषणा केली असून सर्वांनाच मदत होईल, असे प्रयत्न सरकारचे या पॅकेजमध्ये दिसून आले आहेत. शेतकरी, नुकसानग्रस्त घरे, जमिनी आणि जनावरांच्या नुकसानीसाठीही भरीव मदत देण्याचा शासनाचा निर्णय आहे.
शेतकर्‍यांसाठी जाहीर करण्यात आलेले हे आत्तापर्यंतचे सर्वांत मोठे पॅकेज आहे. शेतकरी रब्बीचे पीक घेतोय की नाही हे विचारात न घेता आम्ही दहा हजार रुपयांची मदत करत आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल सकाळीच फोन केला. विम्यासंदर्भात बैठक घेत तातडीने योग्य मदत दिली पाहिजे यासाठी सरकार दबाव आणेल.व्हॅलिडेशनसाठीही आता आपण प्रयत्न करतोय. शेतकर्‍यांना मदत करायची आहे तर ताण सहन करावा लागेल. इतकी अतिवृष्टी होईल याची कल्पना नव्हती. काही बाबींवर ताण सहन करावा लागेल. आत्ताच सांगता येत नाही. पण शेतकर्‍यांना तत्काळ पैसे देणे सुरू करतोय, कुठे कमी करायचं आणि वाढवायचं हे डिसेंबच्या अधिवेशनात बघू, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
253 तालुक्यांना सरसकट मदत
राज्यात अतिवृष्टीमुळे 68 लाख हेक्टर इतक्या जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. साधारणपणे जास्तीचे नुकसान 29 जिल्ह्यांत झाले असून, आपण 253 तालुके सरसकट घेतले आहेत.

♦  हंगामी बागायती शेतीनुकसान भरपाई

♦  प्रतिहेक्टरी 27 हजार रुपये

♦  कोरडवाहू शेतकर्‍यांना हेक्टरी 18 हजार 500 रुपये

♦  बागायती शेतकर्‍यांसाठी प्रति हेक्टरी 32 हजार 500 रुपये

जमीन वाहून गेलेल्यांना हेक्टरी 3.47 लाख रुपये
राज्यात मराठवाड्यासह विविध जिल्ह्यांत झालेल्या अतिवृष्टीग्रस्तांसाठी राज्य सरकारकडून 31 हजार 628 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार जमीन खरडून गेलेल्या शेतकर्‍यांना हेक्टरी 47 हजार रोख नुकसानभरपाई आणि हेक्टरी 3 लाख नरेगाच्या माध्यमातून देण्यात येईल. त्यामुळे जवळपास हेक्टरी साडेतीन लाख रुपये मदत शेतकर्‍यांना मिळणार आहे.

जनावरे आणि घरासाठीही मदतनिधी
दुधाळ जनावरांना 37 हजार रुपयांपर्यंत मदत, गाळ भरलेल्या विहिरींसाठी 30 हजार, कुक्कुटपालनाला 100 रुपये प्रतिकोेंंबडी, नष्ट-पडझड झालेली घरे नव्याने बांधण्यासाठी मदत, डोंगरी भागातील घरांना दहा हजारांची अधिकची मदत. झोपड्यांना मदत, गोठा, दुकानदार यांना 50 हजार मदत करणार. विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करणार.

Editorial Team

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago