नाशिक

सिन्नरला 3620 किलो गोवंश मांस पकडले

दोन वाहनांसह 12 लाख 74 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

सिन्नर ः प्रतिनिधी
नाशिक-पुणे महामार्गावर गुरेवाडी फाट्यावर काल (दि. 1) सकाळी 8.10 सिन्नर एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने दोन वाहनांतून 3620 किलो गोवंश जातीचे मांस पकडले. याप्रकरणी दोन वाहनांसह 12 लाख 74 हजारांचा मुद्देमाल हस्तगत एकाला करत ताब्यात घेतले तर दुसरा वाहनचालक वाहन सोडून फरार झाला. फरदिन निसार कुरेशी (21, रा. काजीबाबा रोड, कुरेशी मोहल्ला, वॉर्ड नं. 2, श्रीरामपूर, जि.अ.नगर) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.

एमआयडीसी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी नाशिक-पुणे महामार्गावर गुरेवाडी फाट्यावर सापळा लावला. सकाळी 8.10 वाजेच्या सुमारास संगमनेरकडून मुंबईच्या दिशेने जाणारी दोन संशयित वाहने आढळून आल्याने पोलिसांनी त्यांना थांबवत तपासणी केली असता हुंदाई आय-20 कारमध्ये (क्र. एमएच-02, बीवाय-9577) 2 लाख 24 हजार रुपये किमतीचे 1120 किलो व बोलेरो पिकअपमध्ये (क्र. एमएच-04, जीसी-9018) असलेले 5 लाख रुपये किमतीचे 2500 किलो असे 7 लाख 24 हजारांचे 3620 किलो गोवंश मांस मिळून आले. पोलिसांनी हुंदाई चालक फरदिन निसार कुरेशी याला ताब्यात घेतले.
तर पिकअपचालक वाहन सोडून पसार झाला. पोलिसांनी दोन्ही वाहनांसह गोवंश मांस असा 12 लाख 74 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फरदिन निसार कुरेशीसह पिकअपचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास पोलीस नाईक चकोर करत आहेत. दरम्यान, सामाजिक वनीकरणाच्या जागेत जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदून या गोवंश मांसाची विल्हेवाट लावण्यात आल्याचे समजते.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago