धुळे :
धुळे तालुक्यातील वलवाडी गावात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. भारतीय सैन्य दलात असलेल्या कपिल बागुल याने पत्नी शारदा कपिल बागुल हिची निर्घृण हत्या केली. प्रेमसंबंधाला अडसर ठरलेल्या पत्नीला विषारी इंजेक्शन देऊन खून करणार्या सैन्य दलातील लिपिकासह प्रेयसी, सासू, सासरे आणि नणंद अशा पाच जणांना पश्चिम देवपूर पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कपिल बाळू बागुल या जवानाचं प्रज्ञा कर्डिले या महिलेसोबत कॉलेजपासून प्रेमसंबंध होते. आता गेल्या काही दिवसांपासून प्रज्ञासोबत जवळीक वाढली होती. जवान कपिल बागुल याची पत्नी शारदा यांच्यात यावरून वाद झाला. त्यानंतर शारदाला संपवण्यासाठी त्याने बळजबरीनं पेस्टीसाईडचं इंजेक्शन दिलं. त्यावेळी शारदा तडफडू लागली आणि तिच्या तोंडातून फेस आला मात्र तो तिथे बसून फक्त तमाशा पाहत राहिला. तिचा छळ करण्यात येत होता. शारीरिक छळ करून मारले, फोन आला तर ती आजारी आहे त्यानंतर अर्ध्या तासात तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. असा कोणता आजार झाला होता, असं नातेवाईकांनी म्हटलं आहे. आपल्या पत्नीला मारणार्या जवानाने त्याने नंतर तिला रूग्णालयात नेण्याचं नाटक केलं आणि घाई करत तिचे अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र कुटुंबियांनी तक्रार केल्यावर सर्व प्रकार उघडकीस आला. मयत महिलेचा भाऊ भूषण महाजन याने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी पती कपिल बाळू बागुल, सासरे बाळू बुधा बागुल, सासू विजया बाळू बागुल (तिघेही रा. वलवाडी), नणंद रंजना धनेश माळी (रा. छत्रपती संभाजीनगर) आणि प्रेयसी प्रज्ञा कर्डीले (रा. धुळे) या पाचही जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर रात्री या पाचही जणांना पोलिसांनी अटक केली.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…