नाशिक

जोगलटेंभीत 4 एकर ऊस जळून खाक

वीजवाहक तारांमध्ये शॉर्टसर्किट जोगलटेंभीत 4 एकर ऊस जळून खाक

महावितरणच्या दिरंगाईमुळे महिला शेतकर्‍याचे 9 लाखांचे नुकसान

सिन्नर : प्रतिनिधी
शेतात लोंबकळणार्‍या वीजवाहक तारांमध्ये घर्षण होऊन डीपीवर शॉर्टसर्किट झाल्याने लागलेल्या भीषण आगीत तालुक्यातील जोगलटेंभी येथे एका महिला शेतकर्‍याचा तब्बल 4 एकर ऊस जळून खाक झाला. मंगळवारी दुपारी 2.15 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत रईसा नूर महमद शेख या महिला शेतकर्‍याचे सुमारे 9 लाख रुपयांचे नुकसान झाले. महावितरणच्या दिरंगाईमुळे घडलेल्या या घटनेने शेख कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे, गेल्या 12 वर्षांत तिसर्‍यांदा हा प्रकार घडल्याने आर्थिक नुकसान किती सहन करायचे, असा प्रश्न या कुटुंबाने उपस्थित केला आहे.

नायगाव येथील रहिवासी असलेल्या रईसा नूर मोहम्मद शेख (56) यांच्या मालकीच्या जोेगलटेंभी येथील गट नंबर 165/1 मध्ये 7 एकर शेतात ‘265 आडसाली’ जातीच्या उसाची लागवड केली आहे. पूर्ण वाढ झालेला हा ऊस तोडणीला आहे. मंगळवारी (दि.9) दुपारी 2.15 वाजेच्या सुमारास रईसा यांचा मुलगा रऊफ नूर मोहम्मद शेख (30) यांना जोगलटेंभी येथील उसाच्या शेतास आग लागल्याची माहिती मिळताच संपूर्ण कुटुंबीय उसाच्या शेतात दाखल झाले. शॉर्टसर्किटमुळे डीपीवरील डीओ पडल्यामुळे या परिसरात वीजही नव्हती. त्यामुळे आग विझवण्यासाठी विद्युत पंप सुरू न झाल्याने शेतकर्‍यांची पंचायत झाली. आजूबाजूच्या वस्तीवरून ट्रॅक्टरमध्ये टाक्या भरून आणत शेतकर्‍यांनी पाठीवरच्या इलेक्ट्रिक फवारणी पंपाच्या सहाय्याने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. याशिवाय, काही शेतकर्‍यांनी आग लागलेल्या उसाच्या शेताच्या मध्ये दोन-तीन सरींमधील ऊस कोयत्याने कापून टाकत आगीला रोखले. सुमारे दोन ते अडीच तासांच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात या शेतकर्‍यांना यश आले. मात्र, तोपर्यंत 4 एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडून खाक झाला होता.

12 वर्षांत तिसर्‍यांदा जळीताची घटना
शेताच्या मध्यवर्ती भागात महावितरण कंपनीने डीपी टाकली आहे. या डीपीवर जाणार्‍या वीजवाहक तारा लोंबकळत असून, त्या टाइट करण्यासाठी महावितरणला वारंवार कळवले आहे. मात्र, त्याची दखल घेतली जात नाही. गेल्या 12 वर्षांत शॉर्टसर्किटमुळे तिसर्‍यांदा जळीताची घटना घडली आहे. महावितरणकडून कुठल्याही प्रकारची नुकसानभरपाई मिळत नाही. उलट शेतातील उभे पीक जळून जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या गलथान कारभाराविरोधात रईसा शेख यांचा मुलगा रऊफ शेख यांच्यासह कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे.

300 टन उसाचे नुकसान

एकरी सरासरी 70 ते 75 टन उसाचे उत्पादन निघते. शेख यांच्या उसाची संगमनेर साखर कारखान्यात नोंदणी करण्यात आलेली असून, सध्या उसाला 3 हजार रुपये प्रतिटन दर मिळतो. सध्याच्या बाजारभावानुसार सुमारे 300 टन ऊस जळून खाक झाल्यामुळे या महिला शेतकर्‍याचे जवळपास 9 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago