नाशिक : प्रतिनिधी
शहरातील हरित अच्छादन वाढावे यासाठी उद्यान विभागाकडून दरवर्षी वृक्षारोपण मोहीम हाती घेतली जाते. चालू वर्षात शहरातील सहाही प्रभागात एक लाख वृक्षांचे रोपण करण्याचे उदिष्ट होते. या वृक्षा चे संवर्धन करण्यासाठी पालिका आता तब्बल ४८ लाख रुपये खर्चास पालिकेने महासभेत मान्यता दिली आहे.
महापालिका उद्यान विभाग सहाही विभागात लागवड केलेल्या रोपाच्या संवर्धनासाठी संरक्षक जाळ्या खरेदी करण्यासाठी महासभेने मान्यता दिली आहे. इच्छामणी एंटरप्रायजेकडून एकूण २५०० जाळ्या खरेदी केल्या जाणार आहेत.
दरवर्षी महापालिकेकडून नवीन जाळ्याची खरेदी केली जाते.त्या गंज लागल्यामुळे खराब होतात. काही जाळ्या नादुरुस्त असून त्याची डागडुजी केल्यास पुनर्वापर शक्य आहे. अशा जुन्या जाळ्यांची दुरुस्ती व रंगरंगोटी करुन तिचा उद्यान विभागाकडून पुनर्वापर केला जाणार आहे. भुमी एंटरप्रायजेसला हे काम देण्यात आले आहे.
दरम्यान जलशुध्दिकरण केंद्र, मलनिस्सारण केंद्र, उद्याने, जाॅगिंग ट्रक या ठिकाणी वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. पण या अगोदरचा अनुभव पाहता दरवेळेस वृक्षा रोपणानंतर संवर्धनाअभावी रोपे मान टाकतात. वृक्ष तोड, संवर्धनाकडे होणारे दुर्लक्ष, भटक्या जनावरांकडून होणारे नूकसान यामुळे वृक्षारोपण मोहिम दिखावाच ठरतो. वृक्ष संवर्धनासाठी उद्यान विभागाने करण्यासाठी ४८ लाख रुपये खर्च करुन सरंक्षक जाळ्या खरेदीचा प्रस्ताव महासभेवर मान्यतेसाठी ठेवला होता. त्यास आयुक्तांनी मान्यता दिली.जेणेकरुन वृक्षांचे संवर्धन व सुरक्षा होईल व शहराच्या ग्रीन फिल्डमध्येही वाढ होईल.
मोखाड्यातील 42 रोजगार सेवक बेमुदत संपावर 5 महिन्यांपासून मानधनाची प्रतिक्षा ऐन पावसाळ्यात उपासमारीची वेळ मोखाडा:…
इगतपुरी : प्रतिनिधी इगतपुरी तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या घोटी शहरातील सुधानगर येथील पती पत्नीने…
ऑनलाइन दोन हजारांचे कर्ज पडले महागात तरुणीसोबत जे घडले ते भयानकच शहापूर: साजिद शेख जाहिरातीला…
उदघाटनापूर्वीच करंजवन - मनमाड पाईपलाईन फुटली खेडगावजवळ शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान.. मनमाड : आमिन शेख मनमाड…
नाशिक प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची जालना येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली…
अशोकनगरमध्ये १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ सिडको/ सातपूर: प्रतिनिधी : सातपूरच्या अशोकनगर परिसरात…