नाशिक

48 सोनोग्राफी केंद्रांची झाडाझडती

भरारी पथकांकडून शहरात धडक मोहीम

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील गंगापूर रोडवरील पंड्या हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदानाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर जाग्या झालेल्या महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील सोनोग्राफी केंद्रांची तपासणी मोहीम हाती घेतली. सोमवारी (दि.2 जून) महापालिकेच्या भरारी पथकांनी 36 सोनोग्राफी केंद्रे व 12 गर्भपात सेंटरची झाडाझडती घेतली.
शहरात 402 सोनोग्राफी सेंटर व 172 गर्भपात केंद्रे आहेत. अशी एकूण 574 केंद्रे असून, दोन महिन्यांत त्यांची तपासणी करून त्याबाबतचा अहवाल महापालिकेला सादर करण्यात येणार आहे.
शहरात अजूनही लपूनछपून गर्भलिंगनिदान करण्याबरोबरच गर्भपाताचे धक्कादायक प्रकार घडत आहेत. छुप्या पद्धतीने हा काळा धंदा सुरू असल्याची कुजबुज होते आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने दुर्लक्षाचे पांघरूण बाजूला करून शहरात सोमवारपासून सोनोग्राफी सेंटरची तपासणी सुरू केली आहे. सोनोग्राफी सेंटरमध्ये गर्भनिदानाचा बोर्ड आहे का, रुग्णाकडे संमतीपत्रक आहे का, प्रत्येक रुग्णाची नोंद माहिती सेंटरमध्ये आहे का? कोणत्या डॉक्टरने सोनोग्राफी सेंटरला जाण्याची शिराफस केली आहे आदींसह सर्व माहिती तपासली जात आहे. आरोग्य विभागाने वीस पथकांची नियुक्ती केली असून, प्रत्येक पथकात दोन आरोग्य अधिकारी आहेत. या पथकाला 1 ते 31 जुलैचा कालावधी देण्यात आला आहे. जेवढ्या सेंटरची तपासणी भरारी पथकांकडून घेतली जात आहे, त्या सर्वांचा अहवाल आठवड्यानंतर महापालिकेला सादर करण्यात येणार आहे.

शहरातील सोनोग्राफी केंद्र व गर्भपात सेंटरची तपासणी सुरू केली आहे. 31 जुलैपर्यर्ंत शहरात ही मोहीम सुरू राहील. शहरात कोणत्याही सोनोग्राफी व गर्भपात सेंटरमध्ये काही संशयास्पद आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
डॉ. जितेंद्र धनेश्वर, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, मनपा

व्यंग गर्भपात काढण्याची प्रक्रिया

एखादी महिला गर्भवती आहे मात्र, सदर गर्भाला वैद्यकीय अडचण असेल, जसे की, त्या गर्भाला काही व्यंग आहे आणि त्या गर्भाचा कालावधी बारा आठवड्यांचा झाला आहे अशा वेळी अधिकृत गर्भपात सेंटरमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञाकडून काढला जाऊ शकतो. परंतु 12 ते 24 आठवड्यांपर्यंतचा गर्भ असेल तर दोन स्त्रीरोगतज्ज्ञांकडून सदर व्यंग गर्भ काढला जातो. मात्र, हे करताना दोन्ही स्त्रीरोगतज्ज्ञ वेगवेगळ्या रुग्णालयांतील असाव्यात. तसेच याबाबतची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला देणे बंधनकारक आहे.

 

Gavkari Admin

Recent Posts

जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल जालन्याच्या जिल्हाधिकारी,

नाशिक:प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची, जालना येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात…

13 hours ago

भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती!

भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती! मुंबईत दोन मोठे फ्लॅट, ठाण्यात दुकानांसह बरंच काही शहापूर  : साजिद…

19 hours ago

विवाह हा संस्कार

भारतीय परंपरेतील प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा संस्कार आहे विवाह. हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळणच…

20 hours ago

श्रावण सफल व्हावा…

श्रावणमास सुरू होतो तसे निसर्गात आल्हाददायक बदल घडू लागतात. आभाळात पांढर्‍याशुभ्र पिंजलेल्या कापसाची नक्षी उमटू…

20 hours ago

एसी लोकलमध्ये प्रवाशाचा चक्क छत्री उघडून प्रवास

एसी लोकलमध्ये प्रवाशाचा चक्क छत्री उघडून प्रवास शहापूर : साजिद शेख लोकल ही मुंबईतल्या प्रवाशांची…

2 days ago

सर्प विज्ञानाची गरज

ह्मलोकेषु ये सर्पा शेषनाग परोगमा:। नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीतो मम सर्वदा॥ ब्रह्मलोकामधील सर्व सर्पांचा राजा नागदेव…

2 days ago