लाईफस्टाइल

फॅशन वीकचे 5 टॉप ट्रेंड्स

फॅशन वीक म्हणजे फक्त डिझायनर कपडे, कॅमेर्‍यांचे फ्लॅश आणि रॅम्पवॉक एवढ्यावरच मर्यादित नसते, तर ती एक संस्कृती असते, एक व्हिजन असतेे, जो आजच्या आणि उद्याच्या फॅशनच्या प्रवाहाचा आरसा दाखवतो. यंदाच्या फॅशन वीकमध्ये काही ट्रेंड्स प्रेक्षकांच्या मनात ठसले आणि स्टाइलप्रेमींना नवे विचार देऊन गेले. चला, जाणून घेऊया ते पाच टॉप ट्रेंड्स आणि त्यासोबतच तुमच्यासाठी काही रिअल-लाइफ स्टाइल सल्ले!

 

1. ट्रान्सपरंट टेक्सचरचा ट्रायम्फ
यंदा रॅम्पवर ीहशशी आणि ीशश-ींर्हीेीसह फॅब्रिकची जोरदार हजेरी होती. गॉसी नेट, टुल आणि जॉर्जेटचा वापर डिझायनरनी अशा रीतीने केला, की पारदर्शकता ही स्टाइल स्टेटमेंट बनली.
तुमच्यासाठी सल्ला :
जर तुमचा स्टाइल गेम थोडा धाडसी आहे, तर ट्रान्सपरंट स्लीव्हज असलेला टॉप आणि लेयरिंगसाठी एक नेट श्रग हा उत्तम पर्याय ठरेल. ऑफिसमध्ये नाही, पण पार्टी किंवा डेटसाठी हा लूक परफेक्ट!
2. इंडियन मेट विथ वेस्टर्न : क्लासिक फ्यूजन
चेवशीप ाशीसश ुळींह खपवळरप ीेेीीं ही संकल्पना प्रत्येक डिझायनरच्या कलेक्शनमध्ये काही ना काही रूपात झळकली. कुर्त्यावर पँटसूट, साडीवर बेल्ट, शेरवानीवर स्नीकर्स आणि जॅकेट्सवर वॉरली प्रिंट हा सगळा फ्यूजनचा फटाका होता.
तुमच्यासाठी सल्ला :
तुमच्या वॉर्डरोबमध्ये एकतरी असे फ्यूजन पीस ठेवा जसे की, इंडो-वेस्टर्न गाऊन, ज्यात घेर भारतीय आहे, पण नेकलाइन वेस्टर्न. सण-समारंभात वेगळा उठाव मिळतो.
3. डीप नेकलाइन आणि स्ट्रक्चर्ड शोल्डर्स
रॅम्पवर ीळश्रर्हेीशीींंशी चे फॉर्म बघून लक्षात येतं की, शरीररेषांना परिभाषित करणारे पोशाख यंदा ट्रेंडमध्ये होते. डीप नेकलाइनसह बोल्ड शोल्डर कट्स, कोर्सेट्स आणि सिंच्ड वेस्ट्सनी अनेक लूक्सना आत्मविश्वासाची धार दिली.
तुमच्यासाठी सल्ला :
हा लूक फार आकर्षक असला, तरी आपण त्याला आपल्या शरीरप्रकारानुसार अ‍ॅडजस्ट केले पाहिजे. डीप नेक असेल तर एखादा दुपट्टा किंवा नेकलेसने बॅलन्स करता येतो.
4. रंगांची उधळण : व्हायब्रंट+पेस्टलचा मिलाफ
यंदा रंगसंगतीत एक वेगळीच कहाणी होती. एका बाजूला लेमन यलो, पॅरट ग्रीन, हॉट पिंकसारखे ऊर्जादायक रंग, तर दुसर्‍या बाजूला मिंट ब्लू, लॅव्हेंडर आणि सॉफ्ट बेजसारखे सौम्य टोन. विशेष म्हणजे, हे दोन्ही रंग एकत्रही वापरले गेले.
तुमच्यासाठी सल्ला :
तुमच्या दिवसभराच्या लूकमध्ये जर थोडी फ्रेशनेस हवी असेल, तर व्हायब्रंट टॉप पेस्टल पॅन्ट्ससोबत मॅच करा. किंवा ऑफिसमध्ये पेस्टल कुर्तीवर हॉट पिंक दुपट्टा टाका.
ताजेपणा जाणवेल.
5. सस्टेनेबल फॅशनची शपथ
फॅशन वीकचं हे खास वैशिष्ट्य होतं. अनेक डिझायनरनी रिसायकल्ड फॅब्रिक्स, नैसर्गिक रंग आणि हँडमेड टेक्निक्सचा वापर करून पर्यावरणपूरक स्टाइल सादर केली. शाश्वत फॅशन हे फक्त ट्रेंड नाही, तर काळाची गरज बनली आहे.
तुमच्यासाठी सल्ला :
ब्रँडपेक्षा व्हॅल्यू  निवडा. हस्तकला असलेले, लोकल आर्टिस्टकडून घेतलेले किंवा ेीसरपळल लेीींेंप मध्ये बनवलेले कपडे वापरायला सुरुवात करा. ट्रेंडी राहूनही सजग ग्राहक बना.
फॅशन वीकपासून काय घ्यायचं?
फॅशन वीक म्हणजे फक्त रॅम्पवरचं सौंदर्य नव्हे, तर तो एक विचार आहे- स्वतःला व्यक्त करण्याचा, घडवण्याचा. त्या चमचमाटामधून आपल्यासाठी काय उपयुक्त आहे, हे समजून घेणं आणि ते आपल्या दैनंदिन शैलीत आणणं हीच खरी स्टाइल स्टोरी!

 

Gavkari Admin

Recent Posts

सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म आर्ट : व्हिडीओ पहिला का?

सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…

20 hours ago

लाचलुचपतच्या पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराने ठोकली धूम या ठिकाणी घडली घटना

पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…

22 hours ago

मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार

मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…

1 day ago

मी रमी खेळत नव्हतो, विषय विनाकारण लांबवला..राजीनामा देण्यासारखे घडलंय तरी काय?माणिक कोकाटे स्पष्टच बोलले

नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…

1 day ago

जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला

जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…

2 days ago

ऑनलाइन गेमच्या व्यसनापायी वैद्यकीय शिक्षण सोडून बनला चोर

ऑनलाइन  गेमच्या व्यसनापायी वैद्यकीय शिक्षण सोडून बनला चोर शहापूर:  साजिद शेख ऑनलाईन मोबाइल गेमच्या आहारी…

4 days ago