उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
हॉटेल व्यवसायातून हमखास नफा मिळवून देण्याचे आश्वासन देत एका तरुणासह त्याच्या कुटुंबीयांकडून तब्बल 50 लाख रुपये उकळल्याचा प्रकार नाशिकरोड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात एका इसमासह त्याची पत्नी व आई यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी निखिल कैलास गुजराथी (रा. शिखरेवाडी, नाशिकरोड) यांची एप्रिल 2021 मध्ये संशयित आरोपी वेदांशू रवींद्र पाटील याच्याशी ओळख झाली. ओळखीचा फायदा घेत आरोपीने स्वतःला हॉटेल व्यवसायातील अनुभवी व्यक्ती असल्याचे सांगत मोठ्या नफ्याचे स्वप्न दाखवले. महिरावणी परिसरात हॉटेल सुरू करण्याचा प्रस्ताव देत, संपूर्ण प्रोजेक्ट यशस्वीरीत्या चालवून देण्याची हमी त्याने दिली.
आरोपीच्या सांगण्यावर विश्वास ठेवून फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांनी कन्सल्टन्सी, बांधकाम, इंटिरियर व इतर खर्चासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. त्यानुसार ‘अर्बन एअर फूड कोर्ट’ या नावाने हॉटेल सुरू करण्यात आले. मात्र अवघ्या काही महिन्यांतच हा व्यवसाय तोट्यात गेल्याने बंद पडला.
यानंतर नुकसान भरून काढण्यासाठी आरोपीने नवीन प्रोजेक्टचे आमिष दाखवले. बंद पडलेल्या हॉटेलमागील जागेवर ओपन ड्राइव्ह इन थिएटर सुरू करून भरघोस नफा मिळवून देण्याचे आश्वासन देत पुन्हा मोठ्या रकमेची मागणी करण्यात आली. या आमिषाला बळी पडून फिर्यादीकडून वेगवेगळ्या तारखांना धनादेशाद्वारे एकूण 50 लाख रुपये आरोपी, त्याची पत्नी व आई यांच्या खात्यावर वटवून घेण्यात आले.
तथापि, प्रस्तावित प्रोजेक्टबाबत कोणतीही ठोस कागदपत्रे किंवा काम प्रत्यक्षात सुरू न झाल्याने, तसेच वारंवार विचारणा करूनही आरोपीकडून टाळाटाळ केली जात असल्याने फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. अखेर फिर्यादीने उपनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून वेदांशू पाटील, तिलोत्तमा पाटील व करिश्मा पाटील यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पावरा करीत आहेत.
50 lakhs were stolen under the lure of making profit न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…