‘कायद्याचा बालेकिल्ला’ गेला कुठे? नागरिकांचा सवाल
पंचवटी : प्रतिनिधी
शहरात वाढलेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी ‘नाशिक कायद्याचा बालेकिल्ला’ ही विशेष मोहीम सुरू केली होती. या मोहिमेंंतर्गत शहरातील गुंडगिरी, त्यांना मिळणारा राजकीय आश्रय तसेच अवैध धंदे विशेषतः अवैध दारूविक्री व मटका रडारवर आणण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले होते. विविध भागांतील मटका अड्डे, अवैध दारू अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले होते. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असल्याचे दाखवून देण्यात आले होते.
काही दिवस उलटताच शहरात पुन्हा अवैध व्यवसायांनी डोके वर काढल्याचे चित्र बघायला मिळू लागले आहे.
आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवीन आडगाव नाका परिसरात भरचौकात एका मद्याच्या हॉटेलच्या खालच्या बाजूस अवैध मटका अड्डा पुन्हा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या चौकातच बसथांबा असल्याने बाहेरगावी जाण्यासाठी थांबलेले असतात. याठिकाणी मटका खेळण्यासाठी स्थानिक आणि बाहेरगावाहून नागरिक येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक तसेच या चौकातून परिसरातील कॉलनी परिसरात जाणार्या येणार्या नागरिकांमध्ये महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असून, कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ‘कायद्याचा बालेकिल्ला’ ही मोहीम केवळ काही काळापुरतीच प्रभावी ठरली का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे पोलिसांनी या भागातील अवैध व्यवसायावर कारवाई केली नाही, तर नाशिकचा ‘कायद्याचा बालेकिल्ला’ लवकरच नवीन आडगाव नाका परिसर ‘गुन्हेगारांचा बालेकिल्ला’ ठरेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत संबंधित पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन अवैध मटका अड्ड्यावर कारवाई करावी, तसेच अशा धंद्यांना पाठीशी घालणार्यांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
Pot stalls in the crowded area of New Adgaon Naka
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…