एस टी च्या ताफ्यात लवकरच नव्या कोऱ्या ५ हजार लालपरी
१३१० खासगी बसेससाठी एसटी महामंडळाची निविदा प्रक्रिया सुरू
नाशिक: प्रतिनिधी
भाडेतत्त्वावरील नव्या १३१० लालपरी बसेस घेण्यासाठी एसटी महामंडळाने ६ सप्टेंबर रोजी निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार मुंबई आणि पुणे प्रदेशासाठी ४५०, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक प्रदेशसाठी ४३० आणि अमरावती व नागपूर प्रदेशासाठी ४६० नव्या लालपरी बसेस भाडेतत्त्वावर घेण्यासाठी इच्छुकांना निविदा भरण्यास एसटी महामंडळाने आवाहन केले आहे. दरम्यान, चालू वर्षात नव्या २ हजार बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.
जुन्या, जीर्ण एसटी बसेसमुळे सर्वसामान्य प्रवाशांना दैनंदिन नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मधल्या काळात एसटी बसेसना आग लागण्याच्या तसेच बसेसचा अपघात होण्याच्या घटना वाढल्या होत्या. याची गंभीर दखल घेत एसटी महामंडळाने आपल्या ताफ्यात नव्या बसेस दाखल करण्यास सुरुवात केली आहे. ई-बसेस टप्याटप्याने दाखल होत आहेत. यापूर्वी देखील महामंडळाने सुमारे ३५० बसेस भाडेतत्त्वावर घेतल्या होत्या. त्यांचा प्रतिसाद अतिशय चांगला असल्यामुळे भविष्यात साध्या लालपरी बसेसची कमतरता भरून काढण्यासाठी यापूर्वीच महामंडळ स्तरावर शासनाच्या निधीतून २२०० लालपरी बसेस घेण्यात सुरुवात झाली आहे. त्यातील पहिल्या ३०० बसेस नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला येण्याची शक्यता आहे. तसेच मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या सूचनेनुसार, सुमारे २००० लालपरी बसेस खरेदी करण्याचा नवा प्रस्ताव महामंडळाने शासनाकडे पाठवला होता.
शिवनेरी आणि शिवशाही या आरामदायी बसेससाठी भाडेतत्त्वावरील बसेस घेण्याचे प्रयोग यापूर्वी एसटी महामंडळाने केलेले आहेत. तशाच पद्धतीने प्रस्ताव सादर केला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास शासनाच्या निधीतून आणखी २ हजार लालपरी बसेस एसटी महामंडळ येत्या वर्षभरात घेणार आहे. त्यामुळे भविष्यात एसटीच्या ताफ्यात ५ हजार ३०० लालपरी बसेस दाखल होत आहेत. त्यामुळे प्रवाशांना चांगल्या दर्जेदार लालपरीतून प्रवास करण्याची संधी लवकरच मिळणार आहे.
खासगी संस्थेचा चालक, डिझेल आणि बसची तांत्रिक देखभाल करणे या अटीवर पुढील ७ वर्षांसाठी या बसेस घेण्यात येणार असून संबंधित खासगी संस्थेला प्रति किलोमीटरप्रमाणे एसटी महामंडळ भाडे अदा करणार आहे.
कसबे सुकेणे येथील तिडके वस्तीवर जेरबंद झाला बिबट्या कसबेसुकेणे: येथील दशरथ पोपट तिडके यांच्या शेत…
सातपूर: प्रतिनिधी सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली . या आगीचे कारण…
लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने कांद्यावरील…
मनमाड : प्रतिनिधी मराठीत एक म्हण आहे साधु संत येता दारी तोच दसरा दिवाळी ती…
ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम ! निर्णयाचे अंनिस कडून…
पारा ५.७ अंशावर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर! निफाड : प्रतिनिधी शहरासह तालुक्यात थंडीने मुक्काम. वाढविला आहे…