बोराळे फाटा येथे तवेराची दुचाकीला धडक, तीन युवकांचा दुर्दैवी मृत्यू

बोराळे फाटा येथे तवेराची दुचाकीला

धडक तीन युवकांचा दुर्दैवी मृत्यू

दिंडोरी : अशोक केंग

निफाड तालुक्यातील कारसुळ येथे जाणाऱ्या दुचाकीला अनियंत्रित तवेराने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तिघे ठार झाले असुन शुक्रवारी रात्री साडे नऊवाजेच्या सुमारास हा अपघात झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहीती अशी ,मंगेश रमेश हिलीम वय 23 ,विजय रमेश हिलीम वय 16, गौरव तुकाराम पवार वय 20 सर्व राहणार कारसुळ तालुका निफाडा असे तिघे युवक MH 15 BA – 2529 या क्रमांकाच्या दुचाकीवरुन वणी येथुन कारसुळ येथे शुक्रवारी रात्री चे सुमारास जात असताना पाठी माघून भरधाव वेगात MH 19 -AP – 9933 या क्रमांकाची तवेरा कार भरधाव वेगात आली व या कारने पुढे जात असलेल्या दुचाकीला जबर धडक दिली झालेल्या या भिषण अपघातात नमुद तिघे कारसुळ येथील तीनही युवक ठार झाले,अपघाताची माहीती मिळताच परीसरातील नागरीक ,रस्त्यावरील वाहनचालक व पोलिस घटनास्थाळी पोहचले तो पर्यंत अपघात करुन तवेरा कारचालक जखमीना वैद्माकीय उपचारासाठी मदत न करता घटनास्थळावरुन फरार झाला होता.दरम्यान या  युवकांना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासाणी अंती मृत घोषित केले.दराम्यान तवेरा कारचालक याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, शरद माधव पवार रा कारसुळ यांनी याबाबत तक्रार दिली आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

जुन्या वादातून युवकाचा कोयत्याने खून…या भागात घडली घटना

सिडको : प्रतिनिधी अंबड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महालक्ष्मी नगर परिसरात जुन्या वादातून एका युवकाचा…

11 hours ago

सोशल मीडियावरही ’आयपीएल’चा फीव्हर; हिताचे रक्षण व्हायला हवे!

आयपीएल अर्थात, इंडियन प्रीमियर लीगचे हे एकोणिसावे वर्ष आहे. सलग एकोणीस वर्षे आपली लोकप्रियता टिकवून…

1 day ago

मान्सून अंदाज चिंताजनक

चार वर्षांपूर्वी म्हणजे 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले. या युद्धाचा परिणाम जगावर…

1 day ago

गणवेश-साहित्य खरेदीत शाळांच्या सक्तीला लगाम!

पालकांना पसंतीच्या दुकानांतून खरेदीची मुभा; शिक्षण विभागाचे परिपत्रक सिन्नर : प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या गणवेश, वह्या-पुस्तके तसेच…

1 day ago

सिन्नरमध्ये आजपासून क्रिकेटचा महासंग्राम

‘आयपीएल’च्या धर्तीवर खेळाडूंचा लिलाव; 16 संघांमध्ये रंगणार टेनिस बॉल डे-नाईट स्पर्धा सिन्नर : प्रतिनिधी सिन्नर…

1 day ago

कळवणला प्रसूतीनंतर काही तासांत मातेचा मृत्यू

उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार कळवण : प्रतिनिधी प्रसूतीसाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या मातेचा प्रसूतीनंतर काही…

1 day ago