स्कूटीवरील महिलेची सोन्याच्या दागिन्यांची बॅग चोरट्याने पळवली

स्कूटीवरील महिलेची सोन्याच्या दागिन्यांची बॅग चोरट्याने पळवली

लासलगाव : वार्ताहर

लासलगाव येथील आय सी आय सी आय बँकेच्या लासलगाव शाखेतून तारण ठेवलेले १३ तोळे सोने सोडवून बॅगमध्ये घेऊन एक महिला स्कुटीवरून जात असताना लासलगाव कोटमगाव रस्त्यावर पल्सरवर आलेल्या चोरट्याने त्या महिलेच्या हातातील स्कुटी वरील बॅग हिसकावून पलायन केल्याची घटना घडली . या प्रकरणी लासलगाव पोलिसांनी या चोरट्याचा शोध सुरू केला आहे
लासलगाव पोलिस ठाण्यात या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार मोक्षा सुरज भोसले वय-२६ रा.सारोळे ना निफाड जि.नाशिक ह्या त्यांच्या स्कुटीवर दिनांक ४ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेचे सुमारास आय सी आय सी आय बँकेच्या लासलगाव शाखे मधुन तारण ठेवलेले १३ तोळे सोने हे सोडवून स्वतः जवळील बॅगेत ठेवुन पिंपळगाव बसंवत कडे जात असतांना कोटमगाव रोड वरील संस्कार इंग्लिश मिडिअम स्कूल जवळून जात असताना पाठीमागुन एक अनोळखी इसम येवुन त्याने फिर्यादीस आवाज दिला त्यामुळे फिर्यादी यांनी गाडीचा स्पीड कमी केल्याने अनोळखी इसम वय अंदाजे 35 डोक्यात काळ्या रंगाचे हेमलेट घातलेले,अंगात गुलाबी रंगाचा शर्ट व काळी पॅन्ट व काळ्या रंगाची पल्सर पाठीमागे नंबर प्लेट नाही याने फिर्यादीच्या गाडीवर ठेवलेली बॅग चोरून घेवुन कोट‌मगाव रोडने पिंपळगाव च्या दिशेने जोरात पळून गेला

या घटनेनंतर मोक्षा सुरज भोसले यांनी तातडीने लासलगाव पोलिसांशी संपर्क साधला असता स पो नि भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लासलगाव पोलिसांनी संशयित व पल्सर गाडीच्या शोध सुरू केला आहे या प्रकरणी रात्री उशिरा लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

जुन्या वादातून युवकाचा कोयत्याने खून…या भागात घडली घटना

सिडको : प्रतिनिधी अंबड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महालक्ष्मी नगर परिसरात जुन्या वादातून एका युवकाचा…

14 hours ago

सोशल मीडियावरही ’आयपीएल’चा फीव्हर; हिताचे रक्षण व्हायला हवे!

आयपीएल अर्थात, इंडियन प्रीमियर लीगचे हे एकोणिसावे वर्ष आहे. सलग एकोणीस वर्षे आपली लोकप्रियता टिकवून…

2 days ago

मान्सून अंदाज चिंताजनक

चार वर्षांपूर्वी म्हणजे 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले. या युद्धाचा परिणाम जगावर…

2 days ago

गणवेश-साहित्य खरेदीत शाळांच्या सक्तीला लगाम!

पालकांना पसंतीच्या दुकानांतून खरेदीची मुभा; शिक्षण विभागाचे परिपत्रक सिन्नर : प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या गणवेश, वह्या-पुस्तके तसेच…

2 days ago

सिन्नरमध्ये आजपासून क्रिकेटचा महासंग्राम

‘आयपीएल’च्या धर्तीवर खेळाडूंचा लिलाव; 16 संघांमध्ये रंगणार टेनिस बॉल डे-नाईट स्पर्धा सिन्नर : प्रतिनिधी सिन्नर…

2 days ago

कळवणला प्रसूतीनंतर काही तासांत मातेचा मृत्यू

उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार कळवण : प्रतिनिधी प्रसूतीसाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या मातेचा प्रसूतीनंतर काही…

2 days ago