बारामती पोटनिवडणुकीत 59.27 टक्के मतदान

राहुरीमध्ये 56.72 टक्के मतदान

बारामती :
बारामती विधानसभेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सायंकाळी 6 वाजेपर्यंत 59.27 टक्के मतदान झाले. बारामतीमध्ये 3,84,579 इतके मतदार आहेत, त्यापैकी 2,02,808 नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. तर राहुरीमध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत 56.72 टक्के मतदान झाले. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज बूथ क्रमांक 233 काटेवाडी येथे मतदानाचा हक्क बजावला. त्याशिवाय जय पवार, पार्थ पवार, सुनेत्रा पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबाने मतदानाचा हक्क बजावला.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अनुक्रमे बारामती,राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी आज पोटनिवडणूक घेण्यात आली. पोटनिवडणुकीत तुलनेने कमी मतदान होते. मात्र, या पोटनिवडणुकीत निम्म्याहून अधिक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
तर राहुरीत भाजपच्या अक्षय कर्डिले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे गोविंद मोकाटे यांच्यासह 7 उमेदवार रिंगणात आहेत. या दोन्ही पोटनिवडणुकीची मतमोजणी 4 मे 2026 रोजी हाती घेऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
राहुरीत दुपारी 1 वाजेपर्यंत 3 लाख 33 हजार 545 मतदारांपैकी 98 हजार 740 मतदारांनी (29.60 टक्के) मतदानाचा हक्क बजावला. राहुरीमध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत 56.72 टक्के मतदान झाले आहे. अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.

शरद पवारांंचे आशीर्वाद घेऊन आले

माध्यमांशी बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, सगळ्याच बाजूने ही भावनिक निवडणूक आहे. शरद पवार यांचे 89 वर्षे वय आहे. त्यांचे घरीच मतदान झाले आहे. त्यांचे आशीर्वाद घेऊन आले आहे. त्यांच्या तब्यतेची विचारपूस केली आहे. मतदानापूर्वी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिवंगत, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट देत त्यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर त्या मतदानासाठी रवाना झाल्या. त्यांच्यासमवेत त्यांचे दोन्ही पुत्र खासदार पार्थ पवार आणि जय पवार दोघे उपस्थित होते. या कृतीमुळे कार्यकर्त्यांमध्येही भावनिक वातावरण पाहायला मिळत आहे.

59.27 percent voting in Baramati by-election

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *