जांबुटके येथे किरकोळ वादातून 60 वर्षाच्या इसमाचा खून

जांबुटके येथे किरकोळ वादातून 60 वर्षाच्या इसमाचा खून,
दिंडोरी पोलिसांच्या चतुराईने आरोपी दोन तासातच अटक

दिंडोरी प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यातील जांबुटके येथे माझ्या आई-वडिलांना माझ्या विरोधात खोटी माहिती देऊन आमच्यात भांडण लावतो या कारणावरून 65 वर्षाच्या इसमाचा खून करण्यात आला आहे. दिंडोरी पोलीसच्या चतुराईने आरोपीला दोन तासातच अटक करण्यात आले आहे.
दिंडोरी पोलिसांनी दिलेल्या माहिती असे की जांबुटके येथील पोलीस पाटील नारायणा अपसुंदे यांनी जांबुटक्यात किरकोळ वादातून खून झाल्याचे फोन द्वारे पोलिसांना कळविण्यात आले. दिंडोरी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच दिंडोरी पोलीस घटनास्थळी पोहोचले यावेळी असे समजले की जांबुटके येथील रहिवासी भाऊसाहेब भगवंत अपसुंदे वय वर्ष 60 आणि आरोपी योगेश निवृत्ती कराटे वय वर्ष 30 या दोघांमध्ये किरकोळ वाद झाला होता. मयत भाऊसाहेब आपसुंदे हा माझ्या आई वडिलांना माझ्या विरोधात खोटी माहिती देऊन आमच्या वाद निर्माण करतो त्यामुळे आमच्या कुटुंबात कायम भांडणं होत असतात. याचा राग मनात धरून आरोपी योगेश कराटे याने मयत भाऊसाहेब अपसुंदे याला त्याच्या घरी जाऊन शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर आरोपी योगेश याने त्याच्या मोटरसायकलवर भाऊसाहेब आपसुंदे याला त्याच्या घरी घेऊन आला तेथे पुन्हा भाऊसाहेब आपसुंदे याला काठीने व पावड्याच्या साह्याने भाऊसाहेबच्या शरीरावर जागोजागी जबर मारहाण करून गंभीर जखमी करून त्याचा खून केला . भाऊसाहेब मेल्यानंतर त्याचा मृत्यू देह आरोपी योगेशने घरातील खांबाला दोरीच्या साह्याने बांधून ठेवला आणि तेथून फरार झाला. तसेच आरोपी योगेश कराटे हा आपल्या आई-वडिलांना व बहिणींना तसेच बायकोला सतत मारहाण करित होता. त्यामुळे या त्रासाला कंटाळून योगेश याची बायको त्याला सोडून निघून गेलेली आहे.घटनास्थळी दिंडोरी पोलीस पोहचले व आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस भवन मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रवीण भोईर यांनी चतुराईने जांबुटके शिवारातील जंगलात लपून बसलेला आरोपी योगेश कराटे याला दोन तासातच पकडून पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासमोर हजर केले त्यानंतर आरोपी योगेश कराटे याला अटक करण्यात आले असून त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे .गुन्हेचा तपास कामी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखुंडे, पोलीस हवालदार अल्ताफ शेख ,पानसरे ,सोनवणे, गायकवाड, भोईर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *