६१ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा नाशिक केंद्रातून ‘चांदणी’ प्रथम

६१ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा नाशिक केंद्रातून ‘चांदणी’ प्रथम

 

मुंबई ;

६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून संवर्धन बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, नाशिक या संस्थेच्या चांदणी या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच नाटयसेवा थिएटर्स, नाशिक या संस्थेच्या इश्क का परछा या नाटकास द्वितीय आणि बॉश फाईन आर्टस, नाशिक या संस्थेच्या शीतयुध्द सदानंद या नाटकासाठी तृतीय पारितोषिक पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या तीन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे नाशिक केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे-

 

दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक रोहित पगारे (नाटक- चांदणी), द्वितीय पारितोषिक आनंद जाधव (नाटक-

 

इश्क का परछा), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक रविंद्र रहाणे (नाटक- चांदणी), द्वितीय पारितोषिक कृतार्थ

 

कंसारा (नाटक- इश्क का परछा), नेपथ्य प्रथम पारितोषिक किरण भोईर (नाटक- शक्ती शिवाचा तेजोगोल),

 

द्वितीय पारितोषिक भूषण गायकवाड (नाटक चांदणी), रंगभूषा : प्रथम पारितोषिक सुरेश भोईर (नाटक-शक्ती शिवाचा तेजोगोल), द्वितीय पारितोषिक माणिक कानडे (नाटक चांदणी) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक दिलीप काळे (नाटक चांदणी) व अनुजा देवरे (नाटक चांदणी), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे सई मोने पाटील

 

(नाटक- शीतयुध्द सदानंद), माधुरी पाटील (नाटक फायनल ड्राफ्ट), प्रतिक्षा बेलसरे (नाटक- खिडक्या).

 

रुपाली देशपांडे-नाईक (नाटक-ब्रेकिंग न्युज), केतकी प्रशांत पंचभाई (नाटक- प्रतिकार), आर्यन जाधव (नाटक-

 

इश्‍च, मनोज शेंद्रे (नाटक- उलगुलान), अमोल थोरात (नाटक- शिवाचा), धनंजय

 

गोसावी (नाटक- शीतयुद्ध सदानंद), संदीप पाचंगे (नाटक- पळा पळा कोण पळे तो).

 

दि. १५ नोव्हेंबर २०२२ ते २० डिसेंबर २०२२ या कालावधीत परशुराम साईखेडकर नाट्यगृह, नाशिक येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण २८ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सर्वश्री मंगेश नेहरे, किरणकुमार अडकमोल आणि विश्वास पांगारकर यांनी काम पाहिले. सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

20 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

20 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

20 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

21 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

21 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

21 hours ago