नाशिक

दोन महिन्यांत 67 कोटींची करवसुली

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेच्या कर विभागाकडे नागरिकांनी 1 एप्रिल ते 5 जूनदरम्यान घरपट्टीचा 57 कोटी 27 लाख तर पाणीपट्टीचा 10 कोटींचा कर भरला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत घरपट्टीच्या वसुलीत 37 कोटींची तर पाणीपट्टीत 5 कोटींची वसुली अधिक झाली आहे. महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी थकबाकी वसुलीसाठी अधिकार्‍यांना विशेष सूचना दिल्यानंतर कर वसुलीचे प्रमाण वाढले आहे.
नाशिकमध्ये अनेकांनी पाणीपट्टी आणि घरपट्टी थकवली आहे. थकीत पाणी आणि घरपट्टीचा आकडा वाढत आहे. ही थकीत रक्कम वसूल करण्यासाठी आता महापालिकेच्या वतीने बड्या थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल वाजवण्यात येणार आहे. ढोल वाजवूनदेखील पैसे न दिल्यास आशा थकबाकीदारांच्या घरातील वस्तू जप्त करण्यात येणार आहेत. त्यामध्ये टीव्ही, फ्रीज, सोफा अशा विविध गोष्टींचा समावेश असणार आहे.
पाणीपट्टी आणि घरपट्टी हे महापालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य साधन असते; मात्र अनेक जण ती भरत नाहीत. करवसुली न झाल्याने उत्पन्नात घट होते. त्यामुळे महसुलाला मोठा फटका बसतो. आता नाशिक महापालिकेने अशा थकबाकीदारांकडून कराची वसुली करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. जे बडे थकबाकीदार आहेत त्यांच्या घरापुढे जाऊन ढोल वाजवण्यात येणार आहे. घरासमोर ढोल वाजवल्याने तरी ते घरपट्टी आणि पाणीपट्टीची थकबाकी भरतील, अशी अपेक्षा महापालिकेला आहे. शहरात अनेकांनी घरपट्टी तसेच पाणीपट्टी न भरल्याने थकबाकीचा डोंगर आहे. थकबाकी वसूल होत नसल्याने महापालिकेच्या अडचणी वाढल्या आहेत. थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेच्या वतीने कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात झाली आहे. याचाच परिणाम म्हणून गेल्या वर्षीपेक्षा घरपट्टीची 37 कोटी 43 लाख रुपयांची वाढ झाली आहे. तर पाणीपट्टीत 5 कोटी 89 रुपये वाढ झाली आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

12 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

12 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

12 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

12 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

12 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

12 hours ago