नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शासकीय, वैद्यकीय पदवी प्रमाणपत्राची पडताळणी करावी तसेच यात जे बोगस डॉक्टर आढळून येतील त्यांची यादी प्रसिद्ध करून त्यांच्यावर कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्ते वैभव देशमुख यांनी केली होती. मात्र, पालिकेकडून अद्याप शहरातील शासकीय व खासगी डॉक्टरांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासाठी वेळच नसल्याचे चित्र आहे. उलट आमच्याकडे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे तक्रारदारांना सांगितले जात आहे.
नुकतेच वसई-विरार महानगरपालिका येथे मुख्य वैद्यकीय अधिकारीच बोगस पदवी ग्रहण करून अनेक वर्षांपासून शहरातील नागरिकांच्या जीविताशी खेळ करीत असल्याचे समोर आलेे. असेच प्रकार नाशिक महापालिकेच्या हद्दीत तर नाही ना, त्यामुळे पालिका कार्यक्षेत्रात असलेल्या सर्व शासकीय व खासगी डॉक्टरांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची तपासणी करण्याची मागणी देशमुख यांनी केली होती. मात्र, अद्याप अशी कोणतीही पडताळणी झाली नसल्याचे चित्र आहे. अशा घटनांमुळे नागरिकांचा आरोग्य विभागावरच्या विश्वासार्हतेला तडा जाऊ नये म्हणून नाशिक महानगरपालिकेमधील सर्व शासकीय आणि सर्व प्रकारच्या खासगी डॉक्टरांच्या वैद्यकीय पदवी प्रमाणपत्राची तत्काळ पडताळणी करून बोगस डॉक्टरांची यादी प्रसिद्ध करावी, अशी मागणी करण्यात आली होती. आम्हाला डॉक्टरांविषयी नक्कीच आदर आहे, परंतु काही बोगस डॉक्टरांमुळे हा पेशा बदनाम होत आहे. यावर योग्य ती कारवाई करा, अशी तक्रार वैभव देशमुख यांनी केली होती.
वसई-विरार महापालिकेत वैद्यकीय अधिकारीच बोगस निघाला. त्यामुळे नाशिक पालिकेच्या हद्दीतील डॉक्टरांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याची मागणी केली होती. मात्र, ही तपासणी अद्याप करण्यात आलेली नाही. पालिकेचा वैद्यकीय विभाग म्हणतो, तुम्ही आम्हाला बोगस डॉक्टरांची माहिती द्या, असे उलट आम्हाला सांगितले जात आहे. मग वैद्यकीय विभाग करणार तरी काय?
-वैभव देशमुख, सामाजिक कार्यकर्ते
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…