नाशिक

सहा वर्षांत 72 शेतकर्‍यांनी संपवले जीवन

निफाडमध्ये सर्वाधिक 18 आत्महत्या; अवकाळी, कर्जबाजारीचा परिणाम

नाशिक : अश्विनी पांडे
नाशिक जिल्हा हा शेतीच्या दृष्टीने विकसित जिल्हा राज्यात मानण्यात येतो. जिल्ह्यात बागायत क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने शेतकरी समृद्ध मानण्यात येतात. मात्र, याच नाशिक जिल्ह्यात गेल्या सहा वर्षांत 72 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. सर्वाधिक 29 आत्महत्या सन 2020 मध्ये झाल्या आहेत. 2021 मध्ये 16 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची नोंद प्रशासनाकडे आहे.

नाशिक जिल्हा कांदा व द्राक्ष उत्पादनासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. कांदा, द्राक्ष, टोमॅटो, फुले, पालेभाज्या निर्यातीत नाशिक राज्यात आघाडीवर आहेत. तांदळासह कडधान्याचेही मोठ्या प्रमाणावर नाशिक जिल्ह्यात उत्पादन घेण्यात येते. मात्र, गेल्या सहा वर्षांत वातावणातील बदल आणि शासनाचे बदलते धोरणे यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आल्याचे चित्र आहे. त्यामुळेच शेतकरी आत्महत्यांची सर्वाधिक प्रकरणे मराठवाडा, विदर्भात उघडकीस येत असताना नाशिक जिल्ह्यातही आता शेतकरी आत्महत्येची प्रकरणे उघडकीस येत आहेत. शेतकरी आत्महत्येचे प्रकरण प्रशासनाकडे आल्यानंतर त्याची छाननी करत प्रशासनाकडून ते पात्र ठरवल्यानंतर शेतकर्‍यांना अर्थसहाय्य देण्यात येते.

निफाडमध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या
गेल्या सहा वर्षांत निफाड तालुक्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्याचे आकडेवारीवरून दिसते. निफाड तालुक्यात 18 शेतकर्‍यांनी सहा वर्षांत आत्महत्या केल्या. त्याखालोखाल बागलाण तालुक्यात 15, मालेगाव 11, दिंडोरी 7 सिन्नर व चांदवड येथे प्रत्येकी पाच, त्र्यंबकेश्वर, नाशिक व येवला तालुक्यात प्रत्येकी दोन, तर पेठ, कळवण, नांदगाव, सुरगाणा व देवळा तालुक्यात प्रत्येकी एका शेतकर्‍याने आत्महत्या केली आहे.

शासनाकडून एक लाखाचे अर्थसहाय्य

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंंबांना शासनाकडून आत्महत्येचे प्रकरण मंजूर झाल्यानंतर एक लाखाचे आर्थिक सहाय्य देण्यात येते. एक लाख रुपये हे संबंधित तहसील कार्यालयामार्फत आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंंबीयांना वितरित करण्यात येतात. एक लाखापैकी पोस्टातील खात्यावर 70 हजार रुपये एफडी स्वरूपात, तर 30 हजार रुपये रोख स्वरूपात वितरित करण्यात येतात.

वर्ष               शेतकरी आत्महत्या
2020               29
2021                16
2022               07
2023               10
2024               06
2025               04

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

11 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

11 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

12 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

12 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

12 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

12 hours ago