नाशिक

जि. प. सीईओंच्या भेटीत चार कर्मचारी गैरहजर

कारणे दाखवा नोटीस बजावली

नाशिक : प्रतिनिधी
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी रविवारी (दि. 24) कळवण तालुक्यातील नवी बेज व ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना अचानक भेट दिली. या भेटीदरम्यान नवी बेज येथील दोेन व ओतूरला दोन असे एकूण चार कर्मचारी अनधिकृतपणे गैरहजर असल्याचे आढळून आले. या गैरहजर कर्मचार्‍यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस
देण्यात आल्या.
नवी बेज प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी व आरोग्य सहाय्यक हे कर्मचारी कार्यस्थळी अनुपस्थित होते, तर ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी तसेच परिचर कार्यस्थळी अनुपस्थित असल्याचे आढळले. या घटनेची गंभीर नोंद घेत मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी तात्काळ जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांना संबंधित कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा सूचना दिल्या, सदर कारणे दाखवा नोटीसबाबत जर समाधानकारक व समर्पक खुलासा प्राप्त झाला नाही, तर कठोर शिस्तभंगात्मक कारवाई करण्याबाबत त्यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांनी कळवण तालुक्यातील नवी बेज व ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देत
पाहाणी केली.
यामध्ये आरोग्य केंद्राची स्वच्छता, रुग्णांना दिल्या जाणार्‍या सुविधांबाबत रुग्णांशी संवाद साधून माहिती घेतली, तसेच औषधांचे स्टॉक बुक व तपासणी सेवा आदी बाबींची तपासणी करून आवश्यक त्या सुधारणा करण्यासंबंधीही सूचना केल्या.

ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित जबाबदार्‍या सर्वोच्च प्राधान्याने पार पाडल्या पाहिजेत. ग्रामीण भागातील रुग्णसेवा बाधित होता कामा नये. याची खबरदारी प्रत्येक आरोग्य कर्मचार्‍याने घेणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास प्रशासनाच्या वतीने कठोर कारवाई करण्यात येईल.
– ओमकार पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक

 

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

11 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

11 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

11 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

11 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

11 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

11 hours ago