नाशिक

तलवारी, गुटख्यासह 9 जण ताब्यात

मालेगावला कोम्बिंग ऑपरेशनमध्ये 15.92 लाखांचा मुद्देमाल जप्त

मालेगाव : प्रतिनिधी
शहरातील गुन्हेगारीला वेसण घालण्यासाठी मालेगाव शहर पोलिसांनी शुक्रवारी पहाटे राबविलेल्या कोम्बिंग आणि ऑलआउट ऑपरेशनमध्ये धडक कारवाई केली.
या मोहिमेत बेकायदेशीर शस्त्रे बाळगणारे आणि प्रतिबंधित गुटखा विक्री करणारे 9 संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांच्या या कारवाईत तलवारी, सुरा, प्रतिबंधित गुटखा, 25 मोटारसायकली आणि एका रिक्षेसह तब्बल 15 लाख 92 हजार 900 रुपये रकमेचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मालेगाव शहर उपविभागात शुक्रवारी (7 ऑगस्ट) पहाटे 2 ते सकाळी 8 वाजेदरम्यान ही व्यापक शोधमोहीम राबवण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे पवारवाडी, आयशानगर आणि आझादनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ठिकठिकाणी छापे टाकण्यात आले.
आझादनगर पोलीस ठाणे : भारतीय शस्त्र कायद्यानुसार कारवाई करत मोहंमद तालीब मोहमद शगीर उर्फ अली (वय 24, रा. बाग-ए-महंमद) आणि शदाब अंजुम अलताफ अहमद उर्फ छोटे (वय 22, रा. अयुबी चौक, इस्लामपुरा) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून 10 तलवारी आणि एक मोटारसायकल जप्त करण्यात आली.
पवारवाडी पोलीस ठाणे : 11 हजार कॉलनी परिसरात कारवाई करत समद खान हनिफ खान याच्याकडून एक तलवार, तर शेख अकबर अब्दुल अजीज (वय 35) याच्याकडून एक सुरा जप्त करण्यात आला. तसेच, बंदी असलेला गुटखा विक्रीप्रकरणी ताज खान सलामत खान ( रुपये 10,448 चा विमल गुटखा), सलीम बेग मन्नान बेग (रुपये 14,400 चा डायरेक्टर गुटखा) आणि कलीम खान सलीम खान (वय 26, रुपये 8,748 चा गुटखा) या तिघांना ताब्यात
घेण्यात आले.
आयशानगर पोलीस ठाणे : आयशानगर हद्दीत तबरेज शेख गणी (रा. आयशानगर चौक) आणि रेहान अहमद मो. हारून (वय 44, रा. नवीन इस्लामपुरा) यांच्याकडून 10,448 रुपये किमतीचा विमल गुटखा आणि एक मोटारसायकल हस्तगत केली. या मोहिमेत पवारवाडी ठाण्यात 5, आयशानगर ठाण्यात 1 आणि आझादनगर ठाण्यात 1 असे एकूण 7 गुन्हे नोंदवून 9 संशयितांना अटक केली आहे. पोलिसांनी 25 दुचाकी, 1 रिक्षा, शस्त्रे व गुटखा असा एकूण 15.92 लाखांचा ऐवज जप्त केला असून, 14 संशयितांची झाडाझडती घेतली. ही धडक मोहीम नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ व सहायक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षक सानप, राहुल खताळ, संजय सूर्यवंशी, प्रतापसिंग बहुरे, संदीप पाटील, दीपक जाधव, संदीप घुगे, सहायक पोलीस निरीक्षक आनंदा माळी यांच्यासह 22 दुय्यम अधिकारी आणि 154 पोलीस अंमलदारांच्या पथकाने
सहभाग घेतला.

9 detained with swords and gutkha

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago