नाशिक

नाशिकमध्ये 18.51 लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त

बोलेरोसह 83 बॉक्स ताब्यात; गुजरातचा चालक अटकेत

दिंडोरी : प्रतिनिधी
दादरा-नगर हवेली आणि दीव-दमन येथे निर्मित झालेली आणि महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला 18 लाख 51 हजार 330 रुपयांचा अवैध विदेशी मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने जप्त केला. ही धडक कारवाई बुधवारी (दि. 5) सातपूर येथील पपाया नर्सरी सिग्नलजवळ, त्र्यंबकेश्वर-नाशिक रस्त्यावर करण्यात आली.
या कारवाईत वाहनचालक फारुख शबरअली शेख (वय 22, रा. वलसाड, गुजरात) याला घटनास्थळावरून अटक केली आहे. संशयित दारू पुरवठादार आणि खरेदीदार यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने पपाया नर्सरीजवळ वाहन तपासणी नाका लावला होता. त्यावेळी गुजरात पासिंगच्या बोलेरो वाहनाची तपासणी केली असता, त्यात फक्त दीव-दमन व दादरा-नगर हवेली येथेच विक्रीसाठी परवानगी असलेली दारू महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे वाहतूक करताना आढळून आली. ही दारू महाराष्ट्रात प्रतिबंधित असल्याने संपूर्ण मुद्देमालासह वाहन जप्त करण्यात आले. ही कारवाई आयुक्त डॉ. राजेश देशमुख (मुंबई), संचालक प्रसाद सुरवे (मुंबई) व विभागीय उपआयुक्त उषा वर्मा (नाशिक) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत विभागीय भरारी पथकाचे प्रभारी निरीक्षक किरण चिदंळे, दुय्यम निरीक्षक राहुल मोडक, सहाय्यक दुय्यम निरीक्षक किरण गांगुर्डे, जवान विलास कुवर, राहुल पवार, दुर्गादास वावस्कर, रामकृष्ण झनकर आणि चालक गोकुळ शिंदे यांनी सहभाग घेतला.

असा आहे जप्त केलेला मुद्देमाल

♦ परराज्यातील विदेशी मद्य- 693 लिटर
♦ परराज्यातील बिअर- 36 लिटर (एकूण 83 बॉक्स)
♦ जप्त वाहन- काळ्या रंगाची ताडपत्री असलेली पांढर्‍या रंगाची महिंद्रा बोलेरो
♦ इतर साहित्य- 1 मोबाइल संच
♦ एकूण किंमत- रु. 18,51,330/-

Foreign liquor stock worth ₹18.51 lakh seized in Nashik.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago