जास्त फायदा मिळवून देण्याच्या आमिषाने 99 लाखांना घातला गंडा

ओझर : वार्ताहर
येथील एचएएलमध्ये नोकरीला असलेल्या एका कर्मचार्‍याला ऑनलाइन ट्रेंडिंगमध्ये पैसे गुंतवणूक करून जास्त फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सुमारे 99 लाख 70 हजारांंचा गंडा घातल्याची घटना घडली.
26 ऑगस्ट ते 29 सप्टेंबर 2025 दरम्यान रामचंद्र गोपाल बिश्वास (वय 39, रा. टाइप टू 120, ओझर टाऊनशिप) यांना गिल, उदय कुमार, रवी कुमार (नाव नक्की माहीत नाही) यांनी संपर्क करून ऑनलाइन पद्धतीने तुम्ही ट्रेंडिंगमध्ये पैसे गुंतवले तर तुम्हाला जास्त पैसे मिळतील. तुमचा फायदा होईल, असे आमिष दाखवले. बिश्वास यांचा विश्वास संपादन करून ऑगस्ट ते सप्टेंबर या दोन महिन्यांत बिश्वास यांच्या अ‍ॅक्सिस बँकेच्या खात्यावरून 99 लाख 70 हजार रुपये स्वतःच्या अकाउंटवर टाकून घेतले, अशी फिर्याद रामचंद्र गोपाल विश्वास यांनी नोंदवली.त्यावरून ओझर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर केदार तपास करीत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *