रोटरी तर्फे मविप्रच्या नीलिमा पवार यांना यंदाचा नाशिक भूषण पुरस्कार प्रदान

प्रामाणिकपणे काम केल्यास नक्कीच यशाची वाट सापडते ः नीलिमा पवार
नाशिक ः प्रतिनिधी
पतीनिधनानंतर अचानक आलेल्या जबाबदार्‍या पेलताना अनेक आव्हाने, संकटातून मार्गक्रमण न घाबरता करीत गेले.संकटकाळी देव आपल्यासोबत असतो हा अनुभव मी प्रत्यक्ष घेतला.त्यामुळे संकटांना घाबरायचे नसते.आपण प्रामाणिकपणे आपल्यातील देवाला साक्ष ठेवून काम करीत गेलो तर वाट सापडत जाते आणि देव आपल्या सोबत चालतो.रोटरीचा हा पुरस्कार माझ्या मातीतल्या माझ्या माणसांनी दिलेला हा लाख मोलाचा पुरस्कार आहे.तो मी सर्व सभासद ,सेवक,मविप्र शिक्षण मंदिरातील सरस्वतीच्या चरणी अर्पण करीत आहे.असे मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलीमा पवार यांनी रोटरी क्लब ऑङ्ग नाशिकच्या वतीने देण्यात येणार्‍या नाशिक भूषण पुरस्कार सोहळ्यात बोलत होत्या.
कालिदास कला मंदिर येथे (दि.15)आयोजित कार्यक्रमात हेमंत टकले (माजी विश्‍वस्त आणि सल्लागार कुसुमाग्रज प्रतिष्ठान,अध्यक्ष नॅब इंडिया)अध्यक्षस्थानी होते.यांच्या हस्ते नीलीमा पवार यांना नाशिक भूषण पुरस्कार देण्यात आला.प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी लीना बनसोड यांची असणार होती.अपरिहार्यकारणास्तव त्याकार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाही.परंतु त्यांनी ध्वनी संदेशाद्वारे आपले मनोगत व्यक्त करून रोटरी आणि नीलीमा पवारांच्या कार्याचा गौरव केला.शुभेच्छा दिल्या.
यावेळी व्यासपीठावर रोटरी कल्ब नाशिकच्या अध्यक्षा डॉ.श्रीया कुलकर्णी,सचिव मंगेश अपशंकर,नाशिक भूषण समितीचे चेअरमन डॉ.राजेंद्र नेहते,विनायक देवधर आदी उपस्थित होते.डॉ श्रीया कुलकर्णीं यांनी अध्यक्षीय भाषण केले.डॉ.राजेंद्र नेहते यांनी पुरस्कारासाठी कशी निवड केली जाते याविषयी मार्गदर्शन केले.डॉ.सुनील संकलेचा यांनी नीलीमा पवारांची ओळख करून दिली.ऍड मनीष चिंधडे यांनी मानपत्राचे वाचन केले.मानपत्र ,स्मृतीचिन्ह,शाल श्रीङ्गळ,पुष्पगुष्छ आणि रोख अकरा हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
नीलीमा पवार यांनी आपल्या भाषणात शैक्षणिक वारसा लाभलेल्या परिवारातून आल्याने प्रशासकीय कामकाजाचे शिक्षण घेतले. याचा उपयोग वसंत पवार हॉस्पिटलची धुरा सांभाळण्यास झाला.अचानक आलेल्या परिस्थितीला तोंड देवून मविप्र संस्थेची वाटचाल यशस्वी करून दाखविली.हे करीत असतांना अनेकदा परिस्थिती हाताबाहेर जात आहे असे वाटल्यावर ज्येष्ठ आणि श्रेष्ठांची मदत,सल्ला,मार्गदर्शन घेवून मार्गक्रमण जिद्दीने करीत राहीले.संस्थेचे ब्रीद वाक्य बहुजन हिताय बहुजन सुखाय आहे.
आपण पुरस्कारासाठी कधीच काम करीत नसतो.समाज आपल्या प्रत्येक कृतीकडे तटस्थपणे पाहत असतो.माझ्यावर रोटरीचा संस्कार आहे. बोलण्याचे,वेळेचे महत्व,हिशोबाची शिस्त इथेच लागली.निखळ आनंद देण्यासोबत सामाजिक कामाची मालकी कशी घ्यावी हेही रोटरीत शिकण्यास मिळाले.आज नाशिक भूषण पुरस्कार माझ्यासाठी बहुमान आहे.यामुळे आणखी लढण्यास बळ मिळणार आहे.असेही त्या पुढे म्हणाल्या.

सावानाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हेमंत टकले यांनी आपल्या भाषणात पुरस्कारार्थी नीलीमा पवार यांच्या कार्याचे कौतुक केले.गेल्या बारा वर्षात संस्थेला शिखरावर नेण्याचे काम नीलीमा पवार यांनी आपल्या कर्तृत्वाने केले आहे.संस्थेची वाढ होतांना गुणात्मक वाढही झाली. आधीच्या वारश्याबरोबर पुढे नेण्याचे काम नीलीमा पवारांनी केले आहे.
डिजिटल विद्यापीठामुळे शिक्षक मुलांमधील संवाद कमी झाल्याने शाळेच्या अनेक मजांना मुलांना मुकावे लागणार आहे.मविप्रने विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणावे अशी विनंती यावेळी केली.तसेच रेडिओ स्टेशनद्वारे शिक्षण सुरू करण्याबाबत विनंती केली.नीलिमा पवार या ज्ञानमंदिरात देवी नाही तर समई आहेत.समई सारखे स्वतः जळत ज्ञानार्जनाचे काम अखंड अविरत करीत आहे.
डॉ.वसंतपवारांसोबतच्या आठवणी जाग्या केल्या.एक कर्तृत्वान महिला उभी राहिल्यानंतर काय करू शकते,एक नव विश्‍व निर्माण करू शकते ही ताकद स्त्रीशक्तीची आहे.त्या स्त्रीशक्तीचा सन्मान नीलीमा पवारयांच्या रुपात रोटरीने दिला.या सन्मानाने रोटरी सन्मानित झाल्याचे यावेळी टकले यांनी गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाची संागता राष्ट्रगीताने झाली.यावेळी मविप्रचे सभासद,पदाधिकारी,रोटरी क्लबचे पदाधिकारी सभासद आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *