अन् माळवाडीकरांचा मतदान बहिष्कार निर्णय मागे
आजी – माजी सरपंच, ग्रामस्थांचा भारती पवार यांना पाठिंबा
नाशिक : प्रतिनिधी
देवळा तालुक्यातील माळवाडी गावातील नागरिकांनी काही दिवसांपूर्वी मतदान न करण्याचा इशारा दिला होता. मात्र आता गावातील आजी माजी सरपंच , कार्यकर्ते अन् ग्रामस्थांनी डॉ भारती पवार यांची भेट घेत त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे संपूर्ण गाव मतदान करनार असून, दिंडोरीतून भारती पवार यांना दुसऱ्यांदा संसदेत पाठवू, असा विश्वास या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीत चौथ्या टप्प्याची मतदान प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार भारती. पवार यांची महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांच्यात मुख्य लढत आहे. डॉक्टर विरुद्ध गुरुजी यांच्या लढाईत कोण बाजी मारते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारती पवार यांनी मतदार संघाचा गत पंचवार्षिक मध्ये केलेल्या विकासकामा मुळे मोठा जनाधार त्यांना मिळत आहे. अत्यंत शांत अन् संयमी असलेल्या भारती पवार या कोणावरही टीका करण्यापेक्षा विकास कामांवर बोलत आहे. त्यामुळे जनतेला देखील त्या आपल्याशा वाटत आहे. माळवाडी गावातील काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी निवडणुकीत मतदान न करण्याबाबत काही दिवसांपूर्वी निर्णय घेतला होता. या पदाधिकाऱ्यांनी भारती पवार यांची भेट घेतली. या भेटीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या सर्व शंकाचे समाधान झाल्याने सर्व गाव आता मतदान करण्यावर आता ठाम झाले आहेत. तर भुजबळ फार्म येथूनही काही पदाधिकर्यांचा दूरध्वनी द्वारे भारती पवार यांना विजयी करण्याचा निरोप आला असल्याचे पदा धिकर्यानी सांगितले. शिष्टमंडलात
माजी उपसरपंच रिंकू पाटील , ग्रामपंचायत सदस्य हेमंत बागुल, भगवान बच्छाव, तात्याभाऊ भदाने , मनोज बच्छाव, जीवन शेवाळे , लक्ष्मण बच्छाव, महेंद्र बच्छाव, ज्ञानेश्वर बागुल, राजेंद्र जाधव , साहेबराव बागुल, अजय अहिरे , पंकज बागुल यांचा समावेश होता.