अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी आरोपीस 20 वर्षाची शिक्षा
दिंडोरी : प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा आरोप सिद्ध झाल्याने संशयीतास 20 वर्षाची शिक्षा व 25 हजाराचा दंड ठोठावला आहे. या बाबत माहीती अशी,बाळु विठ्ठल बेंडकोळी रा.विळवंडी ,ता.दिंडोरी ,जि नाशिक याचे विरोधात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरुन दिंडोरी पोलिसात बलात्कार व पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.2023 साली दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास दिंडोरी पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार यांनी केला होता.आरोपी विरोधात सबळ पुरावे व दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.सदर गुन्ह्याची सुणावणी न्यायाधीश श्रीमती घुले यांचे विशेष अतिरीक्त सत्र न्यायालय क्रमांक 5 यांच्या न्यायालयात झाली.फिर्यादीच्या वतीने अतिरीक्त सरकारी अभियोक्ता श्री मती लिना चव्हाण यांनी बाजु मांडली आरोपीच्या वतीने त्याच्या वकिलांनी बाजु मांडली,न्यायालयाने दोन्ही पक्षाच्या बाजु ऐकुन घेतल्या साक्षिदार व भौतिक पुरावे तपासले असता आरोपी विरोधात पुरावा मिळुन आल्याने भादवि कलम 376(2) (एफ) व पोक्सो 4,8 मधे दोषी ठरवुन 20 वर्षे सश्रम कारावास व 25 हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास 1 वर्ष साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे,सदर सुनावणीत पोउनि संजय पवार व पोहवा अबोने यांनी कामकाज पाहीले.