चिखल  उडाल्याचा बहाणा करीत  २४ हजार लुटले

चिखल  उडाल्याचा बहाणा करीत  २४ हजार लुटले

सातपूर : प्रतिनिधी

चिखल उडवल्याच्या कारणातून दुचाकीवर असलेल्या दोघांनी गाडीची तोडफोड व मारहाण करत लुटल्याची घटना सातपूर पपया सिग्नल येथे घडली. या घटनेत लुटारूंनी मारहाण करीत २४ हजाराची रोकड लांबविली.
या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम मारुती नाडे (रा. औरंगाबाद मुकुदवाडी ) या युवकाने दिलेल्या तक्रारीनुसार, व्यंकटी मारुती नाडे. आणि त्यांचा मुलगा व ऐक जोडीदार असे तिघे गुरुवार (दि.१) त्र्यंबकेश्वर येथून परतत असताना पपया नर्सरी सिग्नलनजीक दुचाकीवरील संशयित दोघांनी अडविले. दोघांनी दुचाकीवरून उतरवून संशयित आरोपींनी चिखल उडवल्याच्या कारणातून मारहाण करीत    स्विप्टकार एम एच २०.एफ जी ५५१२. ची तोडफोड करत  24 हजार रुपये घेऊन फरार झाले. यात व्यंकटी मारुती नाडे वय ५६.तर शुभम मारुती नाडे यांना दुखापत झाली आहे. फिर्यादी यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयातील १०० नंबरला फोन केला. मात्र संशयित दोघेही फरार झाले. घटनास्थळी सातपूर पोलीस स्टेशन कर्मचारी दाखल झाले  होते. मात्र संशयित  फरार झाले होते. संशयित यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत नलावडे. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राकेश न्ह्याळदे. तसेच गुन्हे पथकाचे दीपक खरपडे. भूषण शेजवळ. विलास गिते.सागर गुंजाळ.आदींनी या घटनेचा पंचनामा केला.  दोघा  संशयिताचा सातपूर पोलीस शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *