सावरकर नगर भागातील धोकादायक ट्रान्सफार्मरमुळे नागरिकांचा जीव धोक्यात
नाशिक: प्रतिनिधी
सातपूरच्या सावरकर नगर भागातील निलकंठेश्वर मंदिरासमोर असलेला ट्रान्सफर्मर धोकादायक बनला असून या ट्रान्सफर्मर ची उंची अतिशय कमी असल्याने अनेकदा अपघात होतात, दोनच दिवसांपूर्वी या ठिकाणी एक जण मोटारसायकलस्वार बाळंबाल बचावला, लहानमुले या ठिकाणी खेळत असतात, ट्रान्सफार्मर जवळील काटेरी कुंपण निघून गेले आहे .या ट्रान्सफार्मर जवळील काटेरी कुंपण तातडीने दुरुस्त न केल्यास महावितरण कार्यालयावर परिसरातील नागरिकांना घेऊन मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेना उप महानगर प्रमुख समाधान देवरे यांनी दिला आहे.