शिंदेगावात फटाक्याच्या कंपनीला भीषण आग
नाशिकरोड : प्रतिनिधी
देवळाली गावातील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत शिवलाल विसपुते यांचा मुलगा गौरव विसपुते यांच्या मालकीच्या शिंदेगाव नायगाव रोड येथील फटाक्याचे गोडाऊन मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास आकाशात दूर दिसू लागल्याने व फटाक्याच्या आवाजामुळे रहिवासांच्या आग लागल्याचे लक्षात आले सदर घटनेची माहिती तात्काळ नाशिकरोड अग्निशामक केंद्र व नाशिक रोड पोलिसांना देण्यासाठी आगे चा बंब घटनास्थळी पोहोचेपर्यंत आगेने रुद्र रूप धारण केले होते.तर संबधीत कंपनीचा जवळपास अंदाजे कोटी दिड कोटीचे नुकसान झाल्याचे समजत आहे.शिवाय कंपनीत आठ ते दहा कामगार होते मात्र त्यांना काढण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले आहे. नायगाव रोड येथील फटाक्याच्या गोडाऊनची आग ही क्षणोक्षणी मोठ्या प्रमाणात वाढत चालल्याने आकाशात एकसारखे फटाक्याचे जोर जोरात बार फुटत होते. संपूर्ण परिसर फटाका फूटण्याच्या आवाजाने दुमदुमून गेला होता