औरंगाबाद :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अखेर औरंगाबाद येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद येथे केलेल्या भाषणाबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यानंतर मनसेकडून संतप्त प्रतिक्रिया देण्यात आली असून, अशा गुन्ह्यानंतर मनसे मागे हटणार नाही. आवाज दाबण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आवाज होईलच, असा इशारा देण्यात आला आहे. औरंगाबाद येथे घेतलेल्या सभेत अटी शर्तीचे उल्लंघन झाल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.