लवकरच बिगुल वाजणार; चारचाच प्रभाग
मुंबई :
राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्त आणि वरिष्ठ अधिकार्यांच्या बैठकीनंतर राज्यातील दहा महापालिकांची प्रभागरचना जाहीर करण्यात आली आहे. त्यावरील हरकती व सूचना 4 सप्टेंबरपर्यंत घेता येणार आहेत. 2017 प्रमाणेच चारचा प्रभाग राहणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हालचालींना वेग आला असून, लवकरच बिगुल वाजणार आहे.
या दहा महापालिकांचे जे प्रारूप प्रभागरचनासंबंधित महापालिकांकडून प्राप्त झाली आहे, ते तातडीने प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हरकती सूचना आणि त्यावरील सुनावणी पुन्हा नगरविकास विभागाकडे पाठवून राज्य निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभागरचना करण्याच्या वेळापत्रकामध्ये कुठल्याही प्रकारे विलंब होऊ नये. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या-दुसर्या आठवड्यात प्रभागरचना अंतिम व्हाव्यात यासाठी राज्य निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे.
पुणे महापालिकेत एकूण 41 प्रभाग असणार. यात 40 प्रभाग चार सदस्यीय, तर एक प्रभाग पाच सदस्यीय असेल. पुणे महानगरपालिका क्षेत्राची एकूण लोकसंख्या 2011 चे जनगणनेनुसार 34,81,359 इतकी असून अनुसूचित जातीची लोकसंख्या 4,68,633 आहे व अनुसूचित जमातीची लोकसंख्या 40,687 आहे. निवडून द्यावयाच्या महानगरपालिका सदस्यांची संख्या 165 आहे. एकूण 41 प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक 38 हा पाच सदस्यीय असून, उर्वरित 40 प्रभाग चार सदस्यीय आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेत चार सदस्यांचा एक प्रभाग असल्याने एकूण 128 जागांसाठी ही प्रारूप प्रभागरचना आहे. यावर 4 सप्टेंब पर्यंत सूचना आणि हरकती नोंदवल्या जाणार आहेत. कल्याण- डोंबिवलीत एकूण 122 जागा असतील, तर 31 प्रभाग असणार आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिका 2025 निवडणूक यावर्षी बहुसदस्यीय प्रभागरचना जाहीर करण्यात आली आहे.
नाशकात 29 प्रभागांत चार सदस्यीय रचना दोन प्रभाग तीन सदस्यांचे
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने अखेर प्रारूप प्रभागरचना शुक्रवारी (दि. 22)रात्री जाहीर केली आहे. यात एकूण 31 प्रभाग असून, त्यात 122 नगरसेवक असणार आहेत.दरम्यान, प्रभागरचना 2017 प्रमाणेच असून 29 प्रभागांत चार सदस्सीय तर प्रभाग क्रमांक 15 व 19 मध्ये तीन सदस्य असणार आहेत.
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना जाहीर झाली आहे. दिवाळीनंतर होणार्या महापालिका निवडणुकीसाठी एकूण 31 प्रभाग असणार आहेत. यातील 29 प्रभाग चार सदस्यीय असून, दोन प्रभाग तीन सदस्यीय ठेवण्यात आले आहे. 2017 प्रमाणे एकूण 122 नगरसेवक निवडले जाणार आहेत.सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 2011 च्या जनगणनेनुसार ही यप्रभागरचना जाहीर झाली आहे. शहराची मतदार संख्या 12 लाखाच्या पुढे गेली आहे. त्या आधारे ही प्रभाग रचना करण्यात आली आहे. 122 सदस्यांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. दरम्यान एका प्रभागासाठी पन्नास ते पंचांवन्न हजार मतदार संख्या असणार असून ती गेल्या वेळेस पेक्षा प्रत्येक प्रभागात दहा ते पंधरा हजारांनी वाढली आहे
4 सप्टेंबरपर्यंत हरकती सादर करता येणार
जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेसंदर्भात ज्या नागरिकांना हरकती किंवा सूचना असतील त्यांना आज (दि.23) ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधील कार्यालयीन वेळेत मनपाच्या मुख्य कार्यलयात अथवा विभागीय कार्यालयात लेखी स्वरुपात हरकत देता येईल.
वर्ग अ, ब, क अंतर्गत येणार्या
मुंबई
ठाणे
कल्याण- डोंबिवली
पुणे
नागपूर
नाशिक
पिंपरी
चिंचवड
छत्रपती संभाजीनगर
वसई-विरार
नवी मुंबई.