मोटारसायकल अपघातात पानेवाडीला तरुण ठार

मनमाड : प्रतिनिधी
मनमाड-नांदगाव महामार्गावर अपघातांची मालिका थांबता थांबत नाही. दोन दिवसांपूर्वीच दोन मोटार-सायकलच्या अपघातात दोन जण ठार झाले होते. बुधवारी (दि. 27) मोटारसायकल व अज्ञात वाहनाच्या झालेल्या अपघातात एक तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
पानेवाडी इंधन कंपनीच्या जवळपास ही घटना घडल्याचे समजते. मनमाड ते नांदगाव हा महामार्ग अत्यंत धोकादायक बनला आहे. रोज अपघात होऊन यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. याकडे शासनाने लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
मनमाडवरून नांदगावच्या दिशेने जाणार्‍या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. समाधान हिरे (रा. साकोरा) असे या तरुणाचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वीच याच महामार्गावर हिसवळ शिवारात दोन मोटारसायकलचा अपघात झाला होता. या अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले होते. दोन जण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याबाबत मनमाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलीस तपास करत आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *