नवरात्रोत्सवात गडावर जाण्यासाठी महामंडळाकडून 320 जादा बसेस

नाशिक : प्रतिनिधी
नवरात्रोत्सव काळात भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एस.टी.) विशेष बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. 22 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2025 या कालावधीत व 30 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2025 या कालावधीत एकूण 320 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
बस मार्ग व
बसेसची संख्या :
नांदुरी ते सप्तशृंगी गड – 140 बसेस, नाशिक ते सप्तशृंगी गड – 120 बसेस मालेगाव ते सप्तशृंगी गड – 20 बसेस, मनमाड ते सप्तशृंगी गड – 15 बसेस, सटाणा ते सप्तशृंगी गड – 15 बसेस, नांदगाव ते सप्तशृंगी गड – 10 बसेस याशिवाय यात्रेकरूंसाठी नाशिक, नांदुरी (उत्कर्ष), मनमाड, सटाणा आणि सप्तशृंगी गड येथे विशेष यात्रा बसस्थानके सुरू करण्यात येणार आहेत. नाशिक ते सप्तशृंगी गड या मार्गावर इलेक्ट्रिक बसेस (ई-बस) देखील चालवण्यात येणार असून या बसमुळे प्रदूषणमुक्त व आरामदायी प्रवासाचा अनुभव भाविकांना
मिळणार आहे.
सकाळी 4.00 वाजल्यापासून रात्री 11.30 वाजेपर्यंत ही विशेष बस सेवा उपलब्ध असेल. यात्रेत भाविकांच्या सुरक्षिततेसाठी व सोयीसाठी एस.टी. महामंडळाचे हे नियोजन उपयुक्त ठरणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *