पूजा साहित्य दुकाने, अतिक्रमणामुळे रविवार कारंजा भागात वाहतूक कोंडी

नाशिक : सुजित दिघे
रविवार कारंजा भागात घटस्थापनेच्या पूजा साहित्याची दुकाने ऐन रस्त्यात थाटली असतानाच या भागात यशवंत मंडई पाडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. परिसरात रिकामी जागा झाल्याने याठिकाणी फळविक्रेते, रिक्षा थांबत असल्याने आरकेचा श्वास कोंडू लागला आहे. त्यामुळे रविवार कारंजा वाहनधारकांसाठी डोकेदुखी बनला आहे.
नाशिकच्या रविवार कारंजा भागात रस्त्याच्या कोपर्‍यावर नवरात्री पूजा साहित्य विकणारे दुकान लागले आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला असून वाहतूक कोंडी होत आहे रविवार कारंजाजवळच भररस्त्यात दुकानांजवळ दुकानाजवळ रिक्षा थांबतात आणि दुचाकी चालक रस्त्याच्या कडेला गाड्या लावतात. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक पोलिस याठिकाणी कधीच नसतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत चांगलीच भर पडत आहे. अशोकस्तंभाकडून रेडक्रॉस सिग्नलकडे जाणार्‍या रस्त्यावरुन वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे.

खरेदीचा मुहूर्त

घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर अनेकांनी गृहखरेदी, सोने खरेदी, वाहन खरेदी केली.त्यामुळे बाजारपेठेत नवचैतन्य पसरलेे.

बाजारपेठांत गर्दी

घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी शाळा, महाविद्यालयीन तरुणींनी बाजारपेठेत दांडिया, चनिया चोली, घागरा खरेदी व भाडेतत्त्वावर घेण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *