काही तासांत दोन संशयित गजाआड
मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचा आलेख वाढताच आहे. त्यातच शहर पुन्हा एका खुनाच्या घटनेने हादरले आहे. रविवारी मध्यरात्री न्यू इस्लामपुरा भागात पॉवरलूम कामगाराची हत्या करण्यात आली. मोहम्मद मतीन असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या खुनानंतर काही तासांतच पोलिसांनी सय्यद वसीम सय्यद सलीम उर्फ वस्य (वय 19, रा. आयेशा नगर) व रईस अहमद सईद अहमद उर्फ सईद काल्या (वय 19, रा. जाफर नगर) या दोघा संशयितांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची (दि. 24) पोलिस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रमजानपुरा येथील रहिवासी मोहम्मद मतीन हा इकबाल डाबीजवळील पॉवरलूमवर काम करत होता. मध्यरात्री चहा घेण्यासाठी तो जवळच्या हॉटेलमध्ये गेला असता दोन व्यक्तींनी त्याचा मोबाईल हिसकावून पळ काढला.