नाशिक : प्रतिनिधी
शहरातील वाहतूक बेटांची झालेल्या दुर्दशेमुळे नागरिकांत नाराजीचे वातावरण असताना नूतन मनपा आयुक्त रमेश पवार यांनी या वाहतूक बेटांचा चेहरा मोहरा बदलण्यास सुरूवात केली आहे.शहरातील विविध भागात असलेल्या वाहतूक बेटांची स्वच्छता करण्याबरोबरच त्यांना रंगरंगोटीही केली जात आहे. रविवार कारंजा येथील वाहतूक बेटाची गेल्या काही दिवसांपासून मोठी दुर्दशा झालेली होती. याठिकाणी असलेल्या गरुडाच्या प्रतिकृतीचा रंग उडाल्यामुळे याठिकाणच्या वाहतूक बेटाला अवकळा प्राप्त झाली होती. रविवार कारंजावरील हे वाहतूक बेट धुळमातीने पूर्ण भरले होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून रविवार कारंजावरील वाहतूक बेटाच्या डागडुजीला प्रारंभ झाला आहे. रविवार कारंजावरील गरुडाच्या शिल्पाला रंगरंगोटी केल्यामुळे रविवार कारंजावरील वाहतूक बेट झळाळून निघाले आहे. याशिवाय शहरातील रेडक्रॉस चौकातील वाहतूक बेटाचीही स्वच्छता करण्यात आली आहे. शहरात अनेक वाहतूक बेटे आहेत. त्यातील काही बेटे विविध कंपन्यांनी त्यांच्या सीएसआर फंडातून ही वाहतूक बेटे उभारली आहेत. मात्र, नंतर महापालिका अथवा संबधितांनी त्याची निगा न राखल्याने या वाहतूक बेटांची दुर्दशा झाली आहे. या वाहतूक बेटांच्या