नामदेव ठोमरे
खोडाळा : पालघर जिल्ह्यातील आदिवासी शासकीय आश्रम शाळेचा सुरक्षा प्रश्न चर्चेत असताना पुन्हा एकदा वाडा तालुक्यातील आंबिस्ते शासकीय अनुदानित पद्मश्री अण्णासाहेब जाधव समाज उन्नती मंडळ वस्तीगृह निवासी असलेले मोखाडा तालुक्यातील दोन विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे पुन्हा एकदा आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्याची सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सदर विद्यार्थ्यांचे मृतदेह वाडा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असून पुढील तपास पोलीस करीत आहे.
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील अंबिस्ते गावातील एकात्मिक आदिवासी प्रकल्प जव्हार यांच्या कार्य क्षेत्रात येणारी आदिवासी वस्तीगृह व वस्तीशाळेत शिक्षण घेणारे विदयार्थी 1)देविदास परशुराम नावळे इयत्ता 10 रा. बिवळपाडा ता . मोखाडा. 2) मनोज सीताराम वड इयात्ता 9 वी रा. दापटी ता. मोखाडा हे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी या आदिवासी वस्तीगृहात होते.या दोन्ही विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्याचा कारण समजू शकले नाही यामुळे संबंधित विभागावर पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान ठाणे व पालघर जिल्ह्यातील 520 विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत असून आत्महत्या केलेले विद्यार्थी हे पहिलीपासूनच या शाळेत शिकत होते त्यांचे वर्तन हे चांगले असून अभ्यासात प्रगती ठीक होती अशी माहिती मुख्याध्यापक दत्तात्रेय दाते यांनी दिली