लोंढे पिता -पुत्रास इतक्या दिवसांची कोठडी

सिडको : विशेष प्रतिनिधी

सातपूर येथील गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या माजी नगरसेवक तथा आरपीआय चे नेते प्रकाश लोंढे,त्यांचा मुलगा दीपक लोंढे यांच्यासह इतर संशयितांना आज कोर्टात हजर करण्यात आले. गोळीबार प्रकरणात त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली .

युनिट एक च्या कार्यालयातून त्यांना पोलीस बंदोबस्तात कोर्टात नेण्यात आले, यावेळी नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला असे या संशियत आरोपींना म्हणायला लावले, याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सातपूर आयटीआय सिग्नल जवळ असलेल्या हॉटेलमध्ये गोळीबार करण्यात आला होता, यात तिवारी नामक एक ग्राहक जखमी झाला, या प्रकरणात 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, काहींना अटक करण्यात आली आहे. भूषण लोंढे याच्या शोधासाठी चार पथके ठीक ठिकाणी रवाना करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *